शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

अंधेरी पोलीस ठाण्यातील गुन्ह्याची दाखविली भिती, आजऱ्यातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेची २९ लाखांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 19:23 IST

अनोळखी फोन उचलला आणि घोटाळा झाला 

सदाशिव मोरेआजरा : अंधेरी ( मुंबई ) पोलीस ठाण्यात आपले विरुद्ध गुन्हा दाखल आहे असे सांगून वेळोवेळी कारवाईची भिती दाखवत आजरा येथील सेवानिवृत्त प्राध्यापिका यांची २९ लाख ९३  हजार १५० रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. अशी फिर्याद सेवानिवृत्त प्राध्यापिका मीना चंद्रशेखर मंगळूरकर ( मीरालय शिव कॉलनी आजरा ) यांनी आजरा पोलिसात दिली आहे.अनोळखी इसमाने आपल्याकडील विविध मोबाईल नंबर वरून अंधेरी पोलीस ठाणेत आपले विरुध्द गुन्हा दाखल आहे.यासह अन्य खोटी माहिती मोबाईलवरुन देऊन प्राध्यापिका मीना मंगळूरकर यांची २८ डिसेंबर २०२४ ते १७ जानेवारी २०२५ या कालावधीत आर्थिक फसवणूक केली आहे. सुरुवातीच्या दोन दिवसात अनोळखी इसमाकडून मीना मंगरूळकर यांचा विश्वास संपादन केला आहे. त्यानंतर अंधेरी पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे, तुम्हाला अटक होणार आहे, याबाबतची माहिती कोणालाही सांगायची नाही, पैसे न दिल्यास आपल्याला अटक होईल व बदनामी होईल अशी वारंवार भिती दाखविली व पैशाची मागणी केली. भितीने मीना मंगळूरकर यांनी संबंधित इसमाच्या बँक खात्यावर आरटीजीएस, गुगल पे च्या माध्यमातून २९ लाख ९३ हजारांची रक्कम हस्तांतरीत केली आहे. या दरम्यान त्यांचा मोबाईलही हॅक केल्याचे सांगण्यात आले. आपल्या खात्यावरील पैसे संपल्यानंतरही पैशाची मागणी होऊ लागल्याने त्यांनी आजरा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी फिर्याद दाखल केली असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली भुदरगडचे पोलीस निरीक्षक लोंढे करीत आहेत.

अनोळखी फोन उचलला आणि घोटाळा झाला मीना मंगळूरकर यांना अनोळखी नंबरवरून फोन आला. तो त्यांनी उचलताच त्यांचा विश्वास संपादन करीत गुन्ह्याची माहिती दिली व वारंवार भिती दाखवून पैसे उकळले. सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पैशाची अनोळखी फोन उचलला व घोटाळा झाला अशी विचीत्र अवस्था झाली आहे.

अनोळखी फोन व ऑनलाइन व्यवहारापासून सावधान मोबाईलवरील अनोळखी फोन शक्यतो उचलू नका. ऑनलाईन व्यवहार करताना दक्षता बाळगा. ऑनलाइन व्यवहारातून फसवणूक होण्याची शक्यता असल्याने सावधगिरी बाळगा असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम