शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

शिरोळ तालुक्यातील कॅन्सरची भीती अनाठायी¨; सूरज पवार : जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 00:16 IST

कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे,

कोल्हापूर : कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगात कुठेही सिद्ध झालेले नाही; त्यामुळे शिरोळ तालुक्यामध्ये कीटकनाशकाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचे प्रमाण प्रचंड वाढल्याची जी भीती सर्वत्र पसरली आहे, ती अनाठायी आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर कॅन्सर सेंटरचे संचालक डॉ. सूरज पवार यांनी सोमवारी (दि. २) येथे केले. जनस्वास्थ्य दक्षता समितीतर्फे आयोजित ‘कॅन्सर-समज व गैरसमज’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर होते. डॉ. पवार म्हणाले, कीटकनाशकांमुळे कॅन्सर झाल्याचे जगातील इंग्लंड, अमेरिका, आदी देशांमध्ये झालेल्या संशोधनात कुठेही सिद्ध झालेले नाही. जगभरातील ९० टक्के शोधनिबंधांमध्ये याबाबत स्पष्टता नाही. कीटकनाशकांमुळे कॅन्सर होत असल्याचा शास्त्रीय, ठोस पुरावा नाही. मात्र, कोणत्याही गोष्टीच्या अतिवापरामुळे शरीरावर घातक परिणाम होऊ शकतो. शिरोळ तालुक्यामध्ये खरोखर कॅन्सरचे प्रमाण जादा असल्याचे आणि त्याला कीटकनाशकाचा अतिवापर कारणीभूत असल्याचा शास्त्रीय पुरावा नाही. याबाबत केवळ अंदाज व्यक्त केले जात आहेत. शिरोळमधील कॅन्सरचे प्रमाण जाणून घेण्यासाठी लोकसंख्येवर आधारित आणि घरोघरी जाऊन सर्वेक्षण होणे गरजेचे आहे.

डॉ. सुभाष आठले म्हणाले, कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील संशोधित संभाव्य यादीत कीटकनाशकांचा अंतर्भाव नाही. प्रमाणाबाहेर कीटकनाशके पोटात गेली, तर त्याचे अन्य दुष्परिणाम आहेत. पण, पिकांवर कीटकनाशके वापरली म्हणून कॅन्सर होतो हे म्हणणे चुकीचे आहे.

उलट कीटकनाशकांमुळे भारतात हरितक्रांती झाली. ज्येष्ठ वनस्पतिशास्रज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर म्हणाले, रासायनिक खते व कीटकनाशके यांच्या अतिवापरामुळे पर्यावरणावर वाईट परिणाम होतो. ज्येष्ठ समाजसेवक सुरेश शिपूरकर म्हणाले, विकास साधण्याबरोबरच पर्यावरणाचा तोल सांभाळला जावा.या चर्चासत्रास प्रभाकर मायदेव, सचिन घाटगे, सुधीर हंजे, बृहस्पती शिंदे, आदी उपस्थित होते. जनस्वास्थ्य दक्षता समितीचे अध्यक्ष दीपक देवलापूरकर यांनी प्रास्ताविक केले. आर्किटेक्ट विजय कोराणे यांनी आभार मानले.लवकरच विशेष तपासणी मोहीमकोल्हापूर कॅन्सर सेंटरकडे नोंद झालेल्या रुग्णांची आकडेवारी पाहता शिरोळ तालुक्यातून येणाºया रुग्णसंख्येत वाढ असल्याचे आढळून येत नसल्याचेडॉ. पवार यांनी सांगितले. ते म्हणाले, टाटा मेमोरियल हॉस्पिटल, कोल्हापूर कॅन्सर सेंटर आणि जिल्हा परिषदेतर्फे शिरोळ तालुक्यात कॅन्सरबाबतची विशेष तपासणी मोहीम लवकरच राबविली जाणार आहे.

टॅग्स :pollutionप्रदूषणMedicalवैद्यकीय