शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

हवी इच्छाशक्ती, कोल्हापूरच्या हद्दवाढीला योग्य स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2024 15:39 IST

चारही आमदार महायुतीचे : राज्यातही त्याच विचारांचे सरकार असल्याने पाठबळ शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा गेली तब्बल ३३ वर्षे लोंबकळत पडलेला प्रश्न सुटण्यासाठी आता कधी नव्हे ती अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. हद्दवाढीशी संबंधित निर्णय घेऊ शकतील असे कोल्हापूर उत्तर, दक्षिण, करवीर आणि हातकणंगले या चारही मतदारसंघांत महायुतीचे आमदार निवडून आले आहेत. राज्यातही महायुतीचेच सरकार सत्तारुढ होणार आहे. त्यामुळे आता कोणतीच राजकीय, प्रशासकीय अडचण येण्याची शक्यता नाही. प्रश्न आहे तो फक्त राजकीय इच्छाशक्तीचाच. कोल्हापूर शहराच्या विकासाबद्दल निवडणुकीत मोठमोठ्याने बोलणारे नेते आता कोणती भूमिका घेतात, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.विधानसभा निवडणुकीत आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रचारात हद्दवाढ करणारच अशी थेट भूमिका घेतली होती. ते पहिल्यापासूनच हद्दवाढ व्हायला हवी या मताचे आहेत. यापूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांनी पालकमंत्री होताच निवडक गावे घेऊन हद्दवाढ करणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना या निर्णयाचा काहीच राजकीय फायदा-तोटा होत नसल्याने ते हा निर्णय घेतील असे शहरवासीयांना वाटले होते. परंतु त्यांनीही त्या विषयात पुन्हा फारसे लक्ष घातले नाही.गेल्यावर्षी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हात जोडतो; परंतु कोल्हापूरची हद्दवाढ करण्याचे आवाहन केले आहे. मात्र पुढे काही झाले नाही. हद्दवाढीचा प्रस्ताव तातडीने पाठवा अशी सूचना नगरविकासमंत्री असलेले एकनाथ शिंदे यांनी २०२१ मध्ये केली होती. परंतु तेच पुन्हा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी या प्रश्नाकडे बघून न बघितल्यासारखे केले. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हा प्रश्न सुटला नाही. तेव्हा भाजप-शिवसेना हद्दवाढीची मागणी करत राहिले. पण, हे पक्ष सत्तेत आल्यानंतरही त्यांनी या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले नाही. उलट भाजपच्या मंत्र्यांनी तर हद्दवाढीच्या विषयाला बगल देत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण मानगुटीवर बसविले. आता स्थितीत आता राज्यात नवे सरकार सत्तेत येत आहे. गल्लीपासून मुंबईपर्यंत एकाच युतीचे आमदार व त्यांचेच सरकार सत्तेत येत असल्याने लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन निर्णय झाला तरच हा विषय मार्गी लागू शकतो. त्यासाठी नेत्यांकडे राजकीय इच्छाशक्तीच हवी, ती आता किती दाखवली जाते यावरच हद्दवाढीचे भवितव्य अवलंबून असेल.असे पाठवले प्रस्ताव..

  • शासनाच्या सूचनेनुसार हद्दवाढीचा पहिला प्रस्ताव २४ जुलै १९९० ला पाठवला. त्यानंतर २००२, २०१२, १० जुलै २०१३, २२ जून २०१५ आणि महापालिकेकडे सादर निवेदनांचा अहवाल २०२१, २०२२ आणि २०२३ ला सादर झाला आहे.
  • शेवटचा प्रस्ताव १८ गावे व २ औद्योगिक वसाहतींचा आहे. परंतु तो व्यवहार्य नाही. शहरातील नागरी प्रश्नांची आबाळ पाहून गावातील लोकांना हद्दवाढ व्हायला नको असे वाटते.

जी गावे कोल्हापूर शहराच्या वेशीवर आहेत व आता जी शहरात मिसळली आहेत, त्यांचा प्राधान्याने हद्दवाढीत समावेश करून घेण्याची गरज आहे. परंतु हे करताना त्यांना शहर विकासाचे भागीदार म्हणून समाविष्ट करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. ग्रामपंचायतींचे अस्तित्व ठेवूनही त्यांचा हद्दवाढीत कसा समावेश करता येईल यावर विचार व्हायला हवा. या गावांचा विकास करण्यासाठी तुम्ही शहरात या, असा विचार करणे चुकीचे आहे. कारण ही गावे विकासाच्या वाटेवरच आहेत. त्यांना विकासाचे भागीदार करून घेण्याचा विचार हवा. - बलराज महाजन, वास्तुविशारद, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMahayutiमहायुती