शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

..म्हणून मुलाने केला जन्मदात्या बापाचा खून, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2021 19:34 IST

रागाच्या भरात मुलाने वडीलांच्या डोक्यात लोखंडी फावड्या मारला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

देवाळे : पन्हाळा तालुक्यातील माले येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वडिलांचे अनैतिक संबंध असल्याचे संशयातून मुलाकडून वडीलांच्या डोक्यात लोखंडी फावड्याचा वर्मी घाव घातला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. भिकाजी शंकर वगरे (वय ४७ ) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना काल, गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मयत भिकाजी वगरे यांचे गावातील महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून त्यांच्याशी त्यांची पत्नी व मुलगा यांचा वारंवार वाद होत होता. गुरुवारी सायंकाळी याच कारणावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी मयत भिकाजी याने पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी मुलगा अजित याने आईला कशाला मारहाण करता असे विचारल्याने अजित व भिकाजी यांच्यात पुन्हा वाद सुरू झाला.

हा वाद विकोपाला गेल्याने मुलगा अजित याने रागाच्या भरात वडील भिकाजी यांच्या डोक्यात लोखंडी फावड्या मारला. यात भिकाजी गंभीर जखमी झाले. त्यांना जखमी अवस्थेत उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.मुलानेच आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून करून तो रात्रीच पसार झाला होता. या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी अजित वगरे याचा रात्रभर शोध घेऊन पहाटे त्यास अटक केली. या घटनेची नोंद कोडोली पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी