संकेश्वर :कर्त्या मुलग्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने झालेल्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने वयोवृद्ध पित्याचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी कर्त्या मुलाच्या आणि वयोवृद्ध पित्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.संकेश्वर शहरातील सुभाष रोड परिसरात राहणारे व चिरमुरे व्यापारी राजेंद्र पुंडलिक काळेकर (वय ५७) यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने बुधवारी (९) खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.दरम्यान, मुंबई येथे वास्तव्यास असलेले त्यांचे वडील पुंडलिक गंगाराम काळेकर (वय ८५) यांनाही मुलाच्या मृत्यूची माहिती समजली. धक्का सहन न झाल्याने त्यांचेही हृदयविकाराच्या धक्याने मुंबईतच निधन झाले. गुरूवारी (१०) पिता-पुत्रावर संकेश्वर येथे अंत्यसंस्कार झाले. रक्षाविसर्जन, शुक्रवारी (११) सकाळी ९ वाजता आहे. अथणी सरकारी रूग्णालयाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. मोहन काळेकर यांचे पुंडलिक काळेकर हे वडील तर राजेंद्र हे त्यांचे लहान बंधू होत. पाचवी पिढी व्यवसायातसोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी हे काळेकर कुटुंबियांचे मूळगाव. १२५ वर्षापूर्वी या घराण्यातील मारूती गोपाळ काळेकर हे चिरमुरे व्यवसायानिमित्त संकेश्वरमध्ये आले. संकेश्वरमध्येच त्यांनी चिरमुरे व्यवसायाचा श्री गणेशा केला आणि स्थायिक झाले.आज त्यांची पाचवी पिढी या व्यवसायात कार्यरत आहे.
मुलाच्या निधनाच्या धक्याने पित्याचाही मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 16:50 IST
Death, Karnataka, Sankeswar, Kolhapurnews :कर्त्या मुलग्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्याने झालेल्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने वयोवृद्ध पित्याचाही हृदयविकाराच्या तीव्र धक्याने मृत्यू झाला. एकाच दिवशी कर्त्या मुलाच्या आणि वयोवृद्ध पित्याच्या मृत्यूने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.
मुलाच्या निधनाच्या धक्याने पित्याचाही मृत्यू
ठळक मुद्देमुलाच्या निधनाच्या धक्याने पित्याचाही मृत्यूसंकेश्वर शहरातील घटना : दोघांनाही हृदयविकाराचा धक्का