अल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 01:34 PM2019-08-01T13:34:57+5:302019-08-01T13:40:32+5:30

आईवडिल मला अभ्यास करू देत नाहीत म्हणून मुलांनेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रकरण जामनेर (जि.जळगांव) मध्ये उघडकीस आले असताना तसाच कांहीसा प्रकार येथील इचलकरंजीजवळच्या शहापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात आईवडिलांनीच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलास घराबाहेर काढले आहे. गेले कांही महिने हा मुलगा एका कारखान्यात एकटाच राहत असल्याचे निपन्न  झाले. त्यासंबंधीची तक्रार कोल्हापूरातील बालकल्याण समितीकडे झाली. या न्यायालयीन यंत्रणेने या प्रकरणात बालकास संरक्षण दिले असून त्यास बालगृहात प्रवेश दिला आहे.

Father abducts minor child out of home | अल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेर

अल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेर

Next
ठळक मुद्देअल्पवयीन पोटच्या मुलास बापानेच काढले घराबाहेरशहापूरमधील प्रकार : कोल्हापुरातील बालगृहात प्रवेश

विश्र्वास पाटील

कोल्हापूर : आईवडिल मला अभ्यास करू देत नाहीत म्हणून मुलांनेच पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचे प्रकरण जामनेर (जि.जळगांव) मध्ये उघडकीस आले असताना तसाच कांहीसा प्रकार येथील इचलकरंजीजवळच्या शहापूरमध्ये घडला आहे. या प्रकरणात आईवडिलांनीच भांडणात मध्यस्थी करणाऱ्या मुलास घराबाहेर काढले आहे. गेले कांही महिने हा मुलगा एका कारखान्यात एकटाच राहत असल्याचे निपन्न  झाले. त्यासंबंधीची तक्रार कोल्हापूरातील बालकल्याण समितीकडे झाली. या न्यायालयीन यंत्रणेने या प्रकरणात बालकास संरक्षण दिले असून त्यास बालगृहात प्रवेश दिला आहे.

घडले ते असे : शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. या गुन्ह्यात नमूद माहितीनुसार आई आणि वडील यांच्यात सातत्याने वाद होत होते. वडिलांकडून आईला शिवीगाळ आणि मारहाण होणे हे पौगंडावस्थेत असणाऱ्या मुलाला सहन होत नव्हते. अखेर मुलाने या भांडणात मध्यस्थी करत समजावण्याचा प्रयत्न केला परंतु जन्मदात्यांना ही मध्यस्थी पचनी पडली नाही. वडिलांना त्याचा प्रचंड राग आला आणि त्यांनी मुलालाच घराबाहेर काढले.

गेले काही महिने हा मुलगा शेजारच्या कारखान्यात एकटा राहतो. आई मात्र या मुलाला सकाळ-संध्याकाळचे जेवण पाठवत असे. इथूनच या मुलाचे शिक्षण सुरू होते. ही अवस्था न पाहवल्यामुळे भावकीतील काही लोकांनी शहापूर पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या बाबीचे गांभीर्य ओळखून अल्पवयीन मुलास संरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे होते. मात्र पोलिसांकडून तसे घडले नाही.

बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम २०१५ मधील कलम १०७ अन्वये प्रत्येक पोलिस ठाण्यात 'बाल कल्याण पोलीस अधिकारी' कार्यरत असतो. कोल्हापूर जिल्ह्यात अधिकृतपणे प्रत्येक पोलीस ठाण्यात असा बाल कल्याण पोलीस अधिकारी कार्यरत आहे. त्याअर्थी शहापूर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या बाल कल्याण पोलीस अधिकारी यांची या प्रकरणातील भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. जर या पोलिस अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे, तर या अधिकाºयाने या प्रकरणात कोणती भूमिका घेतली हे स्पष्ट होण्याची गरज आहे.

या प्रकरणातील कांही अनुत्तरित प्रश्र्न

१) जन्माला आलेल्या प्रत्येक बालकाचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करायला नको का?
२) जन्मदात्यांनी जन्म दिला म्हणजे त्या जीवाचं जगणं किंवा त्याला मारणं हा त्यांचा अधिकार आहे असे समजणे कितपत योग्य आहे? (बाल हक्क संहितेनुसार प्रत्येक बालकाला जगण्याचा अधिकार आहे)
३) पोलिसांनी या मुलाच्या काळजी आणि संरक्षणाच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही का केली नाही?
४) प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये बाल कल्याण पोलीस अधिकारी नियुक्त केला नसल्यास त्याची कार्यवाही केव्हा केली जाणार?
५) कुटुंबातूनच मुलांना सुरक्षितता लाभत नसेल आणि पोलिसांसारखी यंत्रणाही दुर्लक्ष करीत असेल तर बाल हक्कांची जबाबदारी कुणाची?


अशा प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या संदर्भात अत्यंत संवेदनशीलतेने वागणे आवश्यक आहे. या मुलांना जगण्याचे हक्क मिळावेत यासाठी कायदेशीर व्यवस्था आहे परंतू त्याची अंमलबजावणी होत नसल्याचा अनुभव या प्रकरणात आला आहे.
अतूल देसाई
बालकल्याण क्षेत्रातील कार्यकर्ते

Web Title: Father abducts minor child out of home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.