शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

कारखान्यांना संरक्षण न दिल्यास पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषण : मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 18:24 IST

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा ...

ठळक मुद्देहसन मुश्रीफ यांचा सरकारला इशारा कायदा असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नाहीआणखी चार कारखाने रडारवर!

कोल्हापूर ,दि. ३० :  ऊस दराबाबत दोन कायदे आहेत. ऊस नियंत्रण समितीचे राजू शेट्टी सदस्य असताना पुन्हा ऊस परिषद घेऊन लोकांच्या भावना भडकविण्याचे कारण काय? आता सरकारने हस्तक्षेप करीत कारखान्यांना संरक्षण दिले पाहिजे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तोडफोड झाली आणि संबधितांवर कारवाई केली नाहीतर जिल्हा पोलीसप्रमुखांच्या दारात उपोषणास बसू, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.

संघटनांमुळे शेतकऱ्यांना चांगले दिवस आले. हे मान्य करीत मुश्रीफ म्हणाले, ऊस दरासाठी सरकारने एफआरपी आणि उत्पन्नावर आधारित ७० : ३० व ७५ : २५ फॉम्युल्यानुसार अंतिम दर देणे बंधनकारक केले आहे. आम्हीही शेतकरी आहोत. शेतकºयांकडून भागभांडवल गोळा करून कारखाने उभे करायचे आणि दर मात्र हे ठरविणार, हे आता चालणार नाही.

कर्नाटकातील कारखाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात ऊस गेला आहे. कागल परिसरातून ५० हजार टन तर चंदगड, आजरा परिसरांतून ३० हजार टन ऊस गेला आहे. आम्ही कारखाने कसे चालवायचे? तो ऊस संघटनेने का अडविला नाही.

कायद्याने दर देणे बंधनकारक असताना दरवर्षी दराचे तुणतुणे चालणार नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. गतवर्षी एफआरपी अधिक १७५ रुपयांवर तडजोड केली. यावर्षी एफआरपीमध्ये ३00 रुपयांची वाढ झाल्याने बॅँकांची उचल व एफआरपी देतानाच अनेकांची दमछाक होणार आहे. काही कारखानदार त्यांच्याशी सामील होऊन दर जाहीर करीत असेल तर जरूर करू देत, असा इशाराही त्यांनी दिला.

आणखी चार कारखाने रडारवर!जिल्हा बॅँकेने नियम सोडून कर्ज दिल्याने चार कारखाने सुरू झाले. गत हंगामात जानेवारीत धुराडी बंद पडली. कामगारांना दहा महिने बसून पगार द्यावा लागला. ‘सब घोडे बारा टक्के’ यामुळे ‘पंचगंगा’, ‘गायकवाड’, ‘दौलत’, ‘इंदिरा’ हे कारखाने दुसऱ्याला चालविण्यास द्यावे लागले. ‘दत्त-आसुर्ले’ विक्रीस निघाला. आणखी चार ते पाच कारखाने रडारवर आहेत. कारखाने वाचले तर शेतकºयांना चांगले पैसे देता येतील, याचे भान संघटनेने ठेवावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

शेट्टी सांगतील तोच कायदा कराकायद्यापेक्षा कोणी स्वत:ला श्रेष्ठ समजत असतील तर ते आता खपवून घेणार नाही. कारखान्यांना संरक्षण द्यायला जमत नसेल तर कायदे मोडून राजू शेट्टी जयसिंगपूरच्या ऊस परिषदेत सांगतील तोच दर, असे एकदा सरकारने आम्हाला सांगावे, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.

काळे-पांढरे बोके कोठे गेले?मध्यंतरी दूध दराच्या आंदोलनात ‘गोकुळ’ला टार्गेट करून ‘पांढºया दुधातील काळे बोके’ अशी टीका केली. स्वत:चा ‘स्वाभिमानी’ दूध संघ काढला; पण इतरांपेक्षा किती जादा दर दिला? कोठे गेले ‘काळे-पांढरे बोके? असा सवाल करीत शेट्टी यांनी एखादा कारखाना चालविण्यास घेऊन दर द्यावा म्हणजे वस्तुस्थिती समजेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.

‘आजरा’ ला परमेश्वरच वाचवू शकतोगत हंगामात आजरा कारखान्याकडे जिल्हा बॅँकेसह इतर बॅँकांची ३१ कोटी ३४ लाखांची कर्जे आहेत. यातील एक रुपयाची परतफेड झालेली नाही. वाढीव एफआरपी पाहता साखरेच्या दरात थोडी जरी घसरण झाली तरी ‘आजरा’ कारखान्याला परमेश्वरच वाचवू शकेल, असे कारखान्याचे माजी अध्यक्ष विष्णुपंत केसरकर यांनी ताळेबंद मांडल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफFarmerशेतकरी