ग्रामपंचायतीने ठराव करून १५ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर दलित समाजातील लोकांनी ग्रामसेवक यांच्याकडे विचारणा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पत्रव्यवहार केला. तरीसुद्धा हा निधी इतरत्र वळविण्याचा प्रयत्न केला आहे. हा निधी दलित वस्तीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी वापरावा या मागणीसाठी उपोषण करण्यात आले.
यामध्ये पंचायत समिती माजी उपसभापती राजकुमार भोसले, रमेश कुरणे, धनपाल भोरे, अंकुश सर्वगोडे, शिवाजी शेटे, अमोल शेटे, प्रकाश भोरे, जयकुमार शेटे, प्रमोद बनसोडे, राकेश कांबळे, अमर दबडे, तानाजी शेटे, संदीप शेटे, अमर कांबळे, स्वप्नील शेटे, शामराव कुरणे सहभागी झाले होते.