शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

कोल्हापूर : पन्हाळा, मलकापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आता वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 17:16 IST

रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे.

ठळक मुद्दे‘रोहयो’ योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर होणार आता वृक्षलागवडसामाजिक वनीकरण विभागाकडून कार्यवाही सुरू

प्रवीण देसाई

कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे. या ठिकाणी यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी रोपे लावली जाणार आहेत.या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरुष नसलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, वननिवासी लाभार्थी यांना प्राधान्य दिल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्जसाहाय्य योजनेतील लहान व सीमांतभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनींवरही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये इच्छुक लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाच एकरांपेक्षा कमी क्षेत्र अपेक्षित आले.इच्छुकांनी या योजनेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायतीने आपल्या शिफारशींसह सामाजिक वनीकरणाच्या संबंधित शाखेत हस्तांतरित करायचा आहे. यानंतर वनपाल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसह प्रस्ताव सामाजिक वनीकरणाकडे सादर करतील.

जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव एकत्रित करून ते मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतील. त्यांच्या मंजुरीनंतर विभागीय सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.या योजनेंतर्गत १ जून ते १३ डिसेंबर या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावरील हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे.

असे असले तरी सामाजिक वनीकरण विभागाने राज्याच्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात या योजनेचा समाविष्ट केला आहे. त्यामुळे १ ते ३१ जुलैदरम्यान शेतकऱ्यांच्या बांधावर रोपे लावली जाणार आहे. या योजनेसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी याबाबत माहिती घेत आहेत.

पन्हाळा, मलकापुरातील ३१२ एकर जमीन निश्चितशेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड या योजनेंतर्गत पन्हाळा व मलकापूर येथील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. पन्हाळा येथील ६२ एकर व मलकापूर येथील २५० एकर जमीन यासाठी निश्चित करण्यात आली आहे. या ठिकाणी रोपे लावण्याचे काम १ जुलैच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी होणार आहे.

‘रोहयो’अंतर्गत जॉब कार्डधारक शेतकऱ्यांच्या बांधावर वृक्षलागवड कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात आला असून, शेतकऱ्यांकडून याबाबत विचारणा होत आहे. पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर क्षेत्र यासाठी निश्चित झाले आहे. यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात या ठिकाणी रोपे लावली जातील.-दीपक खाडे,विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, कोल्हापूर.

 

टॅग्स :forest departmentवनविभागgram panchayatग्राम पंचायतkolhapurकोल्हापूर