शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

शेतकऱ्यांच्या बांधावर होणार वृक्षलागवड -सामाजिक वनीकरणचा पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 00:21 IST

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकºयांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे. या ठिकाणी यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी रोपे लावली जाणार आहेत.या ...

ठळक मुद्दे : ‘रोहयो’ योजनेंतर्गत पन्हाळा, मलकापुरात लागवड

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : रोजगार हमी योजनेंतर्गत आता जॉब कार्डधारक शेतकºयांच्या बांधावर वृक्षलागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडून ग्रामपंचायत स्तरावर सूचना देऊन याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर जमीन यासाठी निश्चित झाली आहे. या ठिकाणी यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी रोपे लावली जाणार आहेत.

या योजनेंतर्गत जॉब कार्डधारक अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी, कर्ता पुरुष नसलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेतील लाभार्थी, वननिवासी लाभार्थी यांना प्राधान्य दिल्यानंतर कृषी कर्जमाफी व कर्जसाहाय्य योजनेतील लहान व सीमांतभूधारक शेतकºयांच्या जमिनींवरही हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमासाठी काही निकष ठेवण्यात आले आहेत. यामध्ये इच्छुक लाभार्थ्यांच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. तसेच पाच एकरांपेक्षा कमी क्षेत्र अपेक्षित आले.

इच्छुकांनी या योजनेसाठी आपले अर्ज ग्रामपंचायतीकडे दाखल करायचे आहेत. त्यानंतर तो अर्ज ग्रामपंचायतीने आपल्या शिफारशींसह सामाजिक वनीकरणाच्या संबंधित शाखेत हस्तांतरित करायचा आहे.यानंतर वनपाल प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून अंदाजपत्रक तयार करून तांत्रिक मंजुरीसह प्रस्ताव सामाजिक वनीकरणाकडे सादर करतील. जिल्ह्यातील सर्व प्रस्ताव एकत्रित करून ते मंजुरीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविण्यात येतील. त्यांच्या मंजुरीनंतरविभागीय सामाजिक वनीकरण कार्यालयाकडून प्रशासकीय मंजुरी देऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवातहोईल.

या योजनेंतर्गत १ जून ते १३ डिसेंबर या कालावधीत शेतकºयांच्या बांधावरील हा वृक्षलागवडीचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. असे असले तरी सामाजिक वनीकरण विभागाने राज्याच्या १३ कोटी वृक्षलागवडीच्या कार्यक्रमात या योजनेचा समाविष्ट केला आहे. त्यामुळे १ ते ३१ जुलैदरम्यान शेतकºयांच्या बांधावर रोपे लावली जाणार आहे. या योजनेसाठी सामाजिक वनीकरण विभागाकडून सर्व ग्रामपंचायतींशी संपर्क साधण्यात आला आहे. त्यानुसार शेतकरी याबाबत माहिती घेत आहेत.पन्हाळा, मलकापुरातील  ३१२ एकर जमीन निश्चितशेतकºयांच्या बांधावर वृक्षलागवड या योजनेंतर्गत पन्हाळा व मलकापूर येथील शेतकºयांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.पन्हाळा येथील ६२ एकर व मलकापूर येथील २५० एकर जमीन यासाठी निश्चित करण्यात आली आहे.या ठिकाणी रोपे लावण्याचे काम१ जुलैच्या वृक्षलागवड कार्यक्रमावेळी होणार आहे. 

‘रोहयो’अंतर्गत जॉब कार्डधारक शेतकºयांच्या बांधावर वृक्षलागवड कार्यक्रम सामाजिक वनीकरण विभागाने हाती घेतला आहे. त्यानुसार ग्रामपंचायत स्तरावर संपर्क साधण्यात आला असून, शेतकºयांकडून याबाबत विचारणा होत आहे. पन्हाळा व मलकापूर येथील ३१२ एकर क्षेत्र यासाठी निश्चित झाले आहे. यंदाच्या वृक्षलागवड कार्यक्रमात या ठिकाणी रोपे लावली जातील.- दीपक खाडे, विभागीय वनअधिकारी,सामाजिक वनीकरण, कोल्हापूर.