शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

शेतकऱ्यांनीच दिली बँकेला वसुलीत आघाडी

By admin | Updated: September 18, 2015 23:14 IST

जिल्हा मध्यवर्ती बँक : एकूण कर्जाच्या ९१ टक्के कर्जाची शेतकऱ्यांकडून वसुली

प्रकाश पाटील --कोपार्डे -जिल्हा बँकेच्या अहवाल सालात कर्जवाटपातील सर्वाधिक वसुली शेतकरी वर्गाकडून झाली आहे. एकूण कर्जाच्या ९१ टक्के वसूल सेवा सोसायटींनी शेतकऱ्यांकडून वसूल करून देऊन जिल्हा बँकेला एमपीएतून बाहेर काढण्यासाठी मोठा हातभार लावला आहे. यामुळेच अध्यक्षांनी अहवालातील प्रास्ताविकात शेतकऱ्यांनी चांगली वसुली देऊन गौरवशाली परंपरा राखल्याचे स्पष्ट केले आहे.बँकेने अहवाल सालात १२४२ कोटी ३० लाखांचे पीककर्ज वितरण करून बँकेने १५७ टक्के उद्दिष्टपूर्ती केली. जिल्ह्यातील दोन लाख ४६ हजार ५३७ शेतकऱ्यांपैकी एक लाख ९३ हजार २६६ शेतकरी सभासदांना म्हणजे ७८ टक्के शेतकऱ्यांना एक हजार ८५६ विकास सेवा संस्थांमार्फत जिल्हा बँकेकडून कर्जपुरवठा करण्यात आला आहे.सन २०१४-१५ या बँकेच्या अहवाल सालात शेती कर्जाची वसूलपात्र रक्कम १३५६ कोटी होती. त्यापोटी विकास सेवा संस्थांनी १२३१ कोटींची बँक पातळीवर वसुली दिली आहे. सेवा संस्थांनी एकूण वसुलीचा आकडा पाहता ९१ टक्के वसुलीचा टप्पा गाठला आहे. याचमुळे शासनाच्या कर्ज परताव्याचा मोठा लाभही शेतकऱ्यांना मिळणार आहे.मात्र, याचवेळी बिगरशेती कर्जाची आकडेवारी पाहता अहवाल सालअखेर एकूण २१३ संस्थांना ६१७ कोटी इतके क्लीन कॅश क्रेडिट व मालतारण कर्ज मंजूर आहे. यातील ४७५ कोटी ६४ लाख येणेबाकी पैकी ९५ कोटी ४१ लाख रुपये थकबाकी आहे. क्लीन कॅश क्रेडिट कर्जाच्या येणेबाकीशी थकबाकीचे प्रमाण १९.४२ टक्के आहे, तर ४० संस्थांना मध्यम व दीर्घ मुदत कर्ज २५१ कोटी २९ लाख मंजूर असून, या संस्थांकडे १७१ कोटी ३३ लाख रुपये येणेबाकी आहे, तर थकबाकी ५७ कोटी ३९ लाख आहे. मध्यम व दीर्घ मुदत कर्जाच्या येणेबाकी थकबाकीचे प्रमाण ३३.४९ टक्के एवढे आहे. यामध्ये जिल्ह्यातील खरेदी-विक्री संघ, नागरी पतसंस्था, पगारदार पतसंस्था, सूतगिरण्या, साखर कारखाने, प्रक्रिया उद्योग संस्था यांना दिले जाते.एकूणच शेतकऱ्यांसाठी दिले जाणारे पीक कर्ज, विविध संस्थांना देण्यात येणारे बिगरशेती कर्ज यांच्या वसुली व थकबाकीमध्ये मोठी तफावत आहे. शेतीकर्ज वसुलीची टक्केवारी ९१ टक्के आहे, तर थकबाकी केवळ नऊ टक्के आहे; पण उत्पन्नाच्या संस्थांमधून थकबाकीचे प्रमाण हे मोठे असून, शेतकरी राजाच जिल्हा बँकेला वसुलीत मोठी आघाडी देत असल्याचे चित्र पाहायला मिळते. म्हणूनच मुश्रीफ यांनी खास करून शेतकऱ्यांचे कौतुक केले आहे.+वर्गीकरण नाहीमागील वर्षी प्रशासकांनी अहवालात शेतीकर्ज व बिगरशेती कर्ज यांच्यातील वसुलीची तफावत संस्थाप्रमाणे दिली होती. यात साखर कारखाने, सूतगिरण्या, पतसंस्था, खरेदी-विक्री संघ यांच्याकडे किती वसुली थकीत आहे याचे वर्गीकरण दिले होते; मात्र नूतन संचालक मंडळाने असे वर्गीकरण देण्याची तसदी घेतलेली नाही. याचा अर्थ काय? असा सवाल तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.