शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कर्जमाफीविरोधात निषेधार्थ भाजप रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 17:06 IST

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ...

ठळक मुद्देफसव्या कर्जमाफीविरोधात निषेधार्थ भाजप रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

कोल्हापूर : शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. यावेळी विनाअट कर्जमाफी देण्याचे आश्वासन देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने नंतर सतरा प्रकारच्या अटी लावून शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांनी मंगळवारी येथे केला.सकाळी अकराच्या सुमारास भाजप कार्यकर्त्यांनी कोल्हापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन सुरु केले. सातबारा कोरा झालाच पाहीजे...फसवी कर्जमाफी करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला.भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष, धनंजय महाडिक, महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी आमदार अमल महाडिक, सरचिटणीस अशोक देसाई, विजय जाधव आदींनी भाषणातून फसव्या कर्जमाफीबद्दल सरकारवर टिका केली.

दरम्यान राहुल चिकोडे यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना निवेदन दिले. आंदोलनात महापालिका विरोधी पक्षनेते विजय सुर्यवंशी, नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, दिलीप मैत्राणी, माणिक पाटील-चुयेकर, डॉ. सदानंद राजवर्धन, सुभाष रामुगडे, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, नचिकेत भुर्के, संतोष माळी, नजीर देसाई, गणेश देसाई, प्रशांत बरगे, संजय सावंत, अशोक लोहार, विजय आगरवाल, अमोल पालोजी,भारती जोशी, किशोरी स्वामी,सुलभा मुजुमदार,प्रमोदनी हार्डिकर, असावरी जुगदार , गायञी राऊत उपस्थित होते. 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर