शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे धरणे आंदोलन : शेतकरी संपाचा दुसरा वर्धापन दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:54 IST

शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांकरीता दोन वर्षांपासून शेतकरी संप व शेतकरी लॉँगमार्चच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. प्रत्येकवेळी सरकारने अंमलबजावणीचे आश्वासन दिले; परंतु अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संपाच्या दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त शनिवारी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देकिसान सभेचे धरणे आंदोलन : शेतकरी संपाचा दुसरा वर्धापन दिनआश्वासन देऊनही सरकारकडून शेतकरी प्रश्नांची पूर्तता नाही

कोल्हापूर : शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह विविध मागण्यांकरीता दोन वर्षांपासून शेतकरी संप व शेतकरी लॉँगमार्चच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. प्रत्येकवेळी सरकारने अंमलबजावणीचे आश्वासन दिले; परंतु अद्याप त्याची पूर्तता केलेली नाही. या पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संपाच्या दुसऱ्या  वर्धापनदिना निमित्त शनिवारी अखिल भारतीय किसान सभेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले.किसान सभेतर्फे १ जून २०१७ ला १२ दिवसांचा शेतकरी संप करण्यात आला होता. यावेळी सरकारला ३४ हजार कोटी ८९ लाखांची शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यास भाग पाडले होते; परंतु आतापर्यंत केवळ निम्मीच रक्कम ठराविक शेतकऱ्यांनामिळाली असून लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत. या काळात सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे पुन्हा दि. २० फेब्रुवारी २०१९ला शेतकरी ‘लॉँग मार्च’ काढण्यात आला.यावेळी वैद्यकीय तंत्रशिक्षण शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांनी अंमलबजावणी करण्याचे लेखी पत्र दिले होते तसेच दर दोन महिन्यांनी आढावा घेण्याचे मान्यही केले होते; परंतु त्याचीही अंमलबजावणी केलेले नाही. त्यामुळे शेतकरी संपाच्या दुसºया वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधले.मागण्यांचे निवेदन जिल्हाध्यक्ष डॉ. उदय नारकर व जिल्हा सेके्रेटरी सुभाष निकम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर केले. निवेदनातील मागण्या अशा, सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी आणि पुन्हा कर्जबाजारी होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करावी. काजू पिकासह सर्व पिकांना हमीभाव जाहीर करून सरकारी खरेदी केंद्रे जिल्हास्तरावर सुरू करावीत. देवस्थान इनाम जमिनी कसणाºयाच्या नावे कराव्यात.

तोपर्यंत जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावे सातबारा पत्रकी नोंद करावी, तसेच वारसा नोंदी तत्काळ कराव्यात. थकीत ‘एफआरपी’ व त्यावरील व्याज वसूल करण्यासाठी सरकारने तत्काळ हस्तक्षेप करावा, चिकोत्रा प्रकल्प पुनर्वसनासह पूर्ण करून कोरडवाहू गावांत जलसंधारणाची कामे नियमित सुरू करावीत, पाणीटंचाईने वाया गेलेल्या पिकांची नुकसानभरपाई द्यावी.आंदोलनात आप्पासो परीट, प्रा. कृष्णात चरापले, विनायक डंके, नारायण गायकवाड, तानाजी यादव, मारुती पोवार, रामचंद्र चव्हाण, संदीप कचकट्टी, महादेव चव्हाण आदी सहभागी झाले होते.

==============(प्रवीण देसाई)

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर