शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

कडकनाथ फसवणुक : शेतकरी एकवटले, तालुका स्तरावर अर्ज गोळा करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:25 IST

बुधवारपर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, फसवणुकीचा आकडा सात कोटींपर्यंत गेला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अभ्यासपूर्वक व भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली.

ठळक मुद्देकडकनाथ फसवणुक : शेतकरी एकवटले, तालुका स्तरावर अर्ज गोळा करण्याचा निर्णयमहारयत अ‍ॅग्रो कंपनीविरोधात २३० अर्ज : साक्षीदारांचे जबाब सुरू

कोल्हापूर : कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमीष दाखवून सुमारे चार कोटींची फसवणूक करणाऱ्या महारयत अ‍ॅग्रो कंपनीविरोधात शेतकरी एकवटले आहेत. तालुका स्तरावर एकत्र अर्ज गोळा करून ते आर्थिक गुन्हे शाखेत दाखल केले जाणार आहेत.

बुधवारपर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, फसवणुकीचा आकडा सात कोटींपर्यंत गेला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अभ्यासपूर्वक व भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली.महारयत अ‍ॅग्रो कंपनीने सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कराराचे उल्लंघन करून शेतकऱ्यांना आतापर्यंत पाच कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गंडा घातला आहे.पोलिसांनी शहरातील स्टेशन रोडवरील कंपनीचे कार्यालय सील केले आहे. शेकडो शेतकºयांशी केलेली करारपत्रके ताब्यात घेतली आहेत. फसवणूकदार शेतकऱ्यांनी धास्ती घेतली असून, तक्रारी देण्यासाठी त्यांची पोलीस मुख्यालयातील आर्थिक गुन्हे शाखेकडे गर्दी होत आहे. बुधवारी आणखी ३0 शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले.

प्रत्येकाने अर्ज दाखल करीत असल्याने त्यांच्या जबाबामुळे पोलिसांचे काम वाढत आहे; त्यामुळे शेतकऱ्यांनीच तालुका स्तरावर एकत्र अर्ज गोळा करून ते दाखल करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. जिल्ह्यातील १२ तालुक्यांतील अर्ज एकत्र करून फसवणुकीचा आकडा निश्चित केला जाणार आहे. आतापर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, सुमारे पाच कोटींपर्यंत आकडा पोहोचला आहे.कंपनीचा संचालक संशयित संदीप मोहिते व हणमंत शंकर जगदाळे (रा. अंबक-चिंचणी, ता. कडेगाव, जि. सांगली) यांना ११ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित मोहिते याचा ताबा घेण्यासाठी इस्लामपूर न्यायालयाकडे अर्ज केला जाणार आहे.

तो ताब्यात मिळाल्यानंतर फसवणुकीचे रॅकेट आणखी जास्त उजेडात येईल. शेतकऱ्यांकडून घेतलेली रक्कम कोठे गुंतवली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, हे स्पष्ट होईल, असेही पोलीस उपअधीक्षक कदम यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Policeपोलिसkolhapurकोल्हापूर