शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

ऊसबिलासाठी शेतकरी पुन्हा आक्रमक, प्रशासनाकडून मध्यस्थी : ५ सप्टेंबरपूर्वी बिले देण्याचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 00:02 IST

साखरवाडी येथील न्यू फलटण साखर कारखान्याच्या थकीत ऊसबिलासंदर्भात ऊसउत्पादक शेतकरी शुक्रवारी पुन्हा आक्रमक झाले. कारखाना प्रशासनाने ५ सप्टेंबरपूर्वी ऊसबिल देण्याचे लेखी आश्वासन दिले.

ठळक मुद्दे न्यू फलटण शुगर वर्क प्रशासनाचे आश्वासन

फलटण : साखरवाडी येथील न्यू फलटण साखर कारखान्याच्या थकीत ऊसबिलासंदर्भात ऊसउत्पादक शेतकरी शुक्रवारी पुन्हा आक्रमक झाले. कारखाना प्रशासनाने ५ सप्टेंबरपूर्वी ऊसबिल देण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर ते तात्पुरते स्थगित केले. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी मध्यस्थी केल्याने आंदोलक शांत झाले.

साखरवाडी येथील न्यू फलटण शुगर वर्क्स या साखर कारखान्याने २०१७-१८ या कालावधीत गळीतासाठी आलेल्या उसाचे पैसे न दिल्याने ऊसउत्पादक शेतकरी अडचणीत आले. व्यवस्थापनाकडून वारंवार केवळ आश्वासने मिळत असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. हा असंतोष गुरुवारी तहसीलदार कार्यालय झालेल्या बैठकीत उफाळून आला.

ऊस उत्पादक शेतकºयांनी उसाचे पैसे मिळाल्याशिवाय आणि संचालकाविरोधात गुन्हे दाखल केल्याशिवाय न उठण्याचा पवित्रा घेत तहसीलदारांच्या दालनात ठिय्या मांडला होता. काहींनी आत्महत्येचा इशारा दिल्याने वातावरण तंग झाले होते. तहसीलदार विजय पाटील यांनी दूरध्वनीवरून प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांच्याशी ऊसउत्पादक आंदोलनसंदर्भात चर्चा केली. साळुंखे-पाटील यांनी शुक्रवारी संचालकांना चर्चेसाठी पाठवून देतो आणि कधी पेमेंट कधी मिळणार, हे लेखी स्वरुपात देतो, असे सांगितल्यावर आंदोलक शांत झाले होते.

ठरल्याप्रमाणे शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास तहसील कार्यालयाच्या आवारात ऊसउत्पादक शेतकरी जमले. संचालक धनंजय साळुंखे-पाटील हे तहसील कार्यालयात आले. यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी धनंजय पाटील यांच्याशी चर्चा करून आंदोलकांच्या भावना सांगितल्या.त्यानंतर सर्वजण बाहेरच्या आवारात ऊस उत्पादकांच्या सामोरे गेले.

यावेळी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी ऊस उत्पादक शेतकºयांना कारखान्याने ५ सप्टेंबरच्या आत बिले देतो, असे आम्हाला सांगितले आहे. असे स्पष्ट करतानाच त्यांनी जर उसाचे पेमेंट केले नाही तर कारखान्याकडून जमीन महसुलाची थकबाकी समजून कारखान्याने उत्पादित केलेली साखर मोलॅसिस जमीन आदी उत्पादनाची विक्री करून रक्कम वसूल करण्यास आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा दिला.

धनंजय साळुंखे-पाटील म्हणाले, ‘कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकºयांचे पैसे देण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करत आहोत. कारखाना अडचणीत असल्याने आम्ही बरेच पर्याय शोधले; पण अनेक वेळा अडचणी आल्यामुळे उसाचे पेमेंट करता आले नाही.’

फलटण कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, धनंजय महामुलकर, नितीन यादव यांनी पाच तारखेपर्यंत आंदोलन मागे घेत आहोत. या वेळेत उसाचे पेमेंट मिळाले नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.कारखाना व्यवस्थापन प्रयत्नशील..शेतकºयांची देय असलेली रक्कम कोणत्याही परिस्थितीत ५ सप्टेंबरच्या आत देणार आहोत. कारखाना व्यवस्थापन यासाठी प्रयत्नशील असून, कारखाना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आणि पुन्हा सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आणि व्यक्तींशी या संदर्भात बोलणे सुरू आहे. ऊस उत्पादक शेतकºयांना वेळेवर पेमेंट न मिळाल्याने त्यांना आलेल्या अडचणीची आम्हाला जाणीव आहे,’ असे धनंजय पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.

फलटण तहसील कार्यालय परिसरात शुक्रवारी संतप्त ऊस उत्पादक शेतकरी जमा झाले होते. त्यांच्या प्रश्नांना धनंजय साळुंखे-पाटील यांनी उत्तरे दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMorchaमोर्चा