शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कर्जमुक्त; पण कोल्हापूर जिल्हा बॅँक अडकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 11:23 IST

राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केल्याची प्रमाणपत्रे वाटली. त्यांच्या खात्यावर जमाखर्च करण्याचे आदेश जिल्हा बॅँकांना दिले; पण त्याचे पैसे अद्याप बॅँकेला मिळाले नाहीत. जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांचा ११ लाख ८४ हजारांचा जमाखर्च कागदोपत्री झाला आहे.

ठळक मुद्देसत्कार केलेल्या २७ शेतकऱ्यांचे अद्याप पैसेच नाहीतकिती शेतकरी पात्र व अपात्र ठरतील, याबाबत अद्याप संदिग्धता७७ सहकारी संस्था,स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपात्र

कोल्हापूर ,दि. ०४ : राज्य सरकारने मोठा गाजावाजा करीत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती केल्याची प्रमाणपत्रे वाटली. त्यांच्या खात्यावर जमाखर्च करण्याचे आदेश जिल्हा बॅँकांना दिले; पण त्याचे पैसे अद्याप बॅँकेला मिळाले नाहीत. जिल्ह्यातील २७ शेतकऱ्यांचा ११ लाख ८४ हजारांचा जमाखर्च कागदोपत्री झाला आहे.

जिल्ह्यातील पीककर्जाचा ९० टक्के पुरवठा जिल्हा बॅँकेच्या माध्यमातून होत असल्याने कर्जमाफीचा थेट परिणाम बॅँकेवर होतो. शासनाच्या निकषानुसार दीड लाखाच्या आतील ४९ हजार ९३७ शेतकरी थकबाकीदार आहेत. त्यांची १७३ कोटी ३० लाखांची थकबाकी आहे.

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या २ लाख ९ हजार २०५ शेतकऱ्यांचा ३६२ कोटी ९५ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. लेखापरीक्षकांच्या तपासणीनंतर जिल्ह्यातील २ लाख ६२ हजार ४६७ शेतकऱ्यांचा ५८५ कोटी १३ लाखांचा प्रस्ताव अंतिम झाला आहे. त्यातून आता चाळण लागून किती शेतकरी पात्र व अपात्र ठरतील, याबाबत अद्याप संदिग्धता आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली, हे दाखविण्यासाठी राज्य सरकारने घाईगडबडीने १८ आॅक्टोबरला प्रत्येक जिल्ह्यातून दोन शेतकऱ्यांना बोलाविले. त्यांना कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याच पद्धतीने जिल्हा पातळीवरही २५ शेतकऱ्यांचा सत्कार झाला.

या २७ शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या रकमेचा जमाखर्च करण्याचे आदेश सरकारने बॅँकांना दिले. कर्जमुक्तीची प्रमाणपत्रे वाटप करून १५ दिवस उलटले तरी अद्याप त्या शेतकऱ्यांचे ११ लाख ८४ हजार रुपये जिल्हा बॅँकेला मिळाले नाहीत.

७७ सहकारी संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपात्रराज्य सरकारच्या ‘आय टी’ विभागाकडून पाठविलेल्या ‘ग्रीन’ यादीची तालुकास्तरीय समितीने छाननी केली. यामध्ये ७७ सहकारी संस्था व स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी अपात्र ठरले. सर्वाधिक करवीर तालुक्यातील २९ जणांचा यात समावेश आहे.

 

टॅग्स :Farmerशेतकरीbankबँक