शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

घराची भिंत अंगावर कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, राधानगरी तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 16:46 IST

वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळल्याने जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.

आमाजाई व्हरवडे : जुन्या घराची भिंत कोसळून एका शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. राधानगरी तालुक्यातील आणाजे गावात ही घटना घडली. आनंदा ज्ञानू जाधव (वय ६५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत माहिती अशी की, आंनदा जाधव यांनी घराच्या बांधकामासाठी आठ दिवसापूर्वी घराच्या लहान भिंती काढण्याचे काम सुरु केले होते. आज मुख्य घर पाडून जागा रिकामी करण्यासाठी गावतीलच आठ दहा लोक येणार होते.त्यामुळे घरातील साहित्य कुठे ठेवायचे हे पाहात असताना अचानक मध्यभागी असणारी वीस फुट उंचीची भिंत त्यांच्या अंगावर कोसळली. यात जाधव हे दगड मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. लोकांनी मदत कार्य करुन त्यांना बाहेर काढले. उपचारासाठी कोल्हापूरला घेवून जात असाताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.शवविच्छेदनासाठी त्यांना सोंळाकूर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले व शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिला. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसात झाली असून पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी