शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
2
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
3
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
4
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
5
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
6
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
7
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत
8
श्रावणात ४ गुरुवार: ४ कामे करा, विश्वास ठेवा; अशक्य शक्य होईल, स्वामी सोबत असतील, भिऊ नकोस…
9
पावसाचे तांडव! घरांमध्ये शिरले पाणी आणि चिखल, गाड्या दबल्या गाळात; थरकाप उडवणारी दृश्ये
10
J&K: ४८ तास, ४ कारवाया अन् ५ दहशतवादी ठार; सुरक्षा दलांना मिळाले मोठे यश
11
पहिला श्रावण गुरुवार: ८ राशींना चौफेर लाभ, भाग्याची साथ; भरघोस भरभराट, स्वामींची अपार कृपा!
12
नवरा-बायकोचा घटस्फोट, नंतर दोघांनाही आवडली एकच मुलगी, एकत्र राहू लागले अन् मग...
13
भारत-सीरिया राजकीय संबंधांच्या नव्या पर्वाला सुरुवात, भारताचा फायदा काय? समजून घ्या
14
वाढदिवसाला बारीक होण्याचा अट्टाहास ठरला जीवघेणा; १६ वर्षांच्या मुलीने 'असं' डाएट केलं अन्...
15
भर रस्त्यात कारचं पार्किंग, स्टेअरिंगवर चक्क कुत्रा! अंधेरीच्या लोखंडवालामध्ये अजब प्रकार; व्हिडिओ व्हायरल...
16
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
17
ज्योतिबा डोंगरावर चोपडाई देवीची श्रावणषष्ठी यात्रा सुरू; पहा आईचे विलोभनीय रूप!
18
Kamchatka Tsunami : जगाचा छोटासा कोपरा बनला भूकंपाचा अड्डा, एका झटक्यात 'या' १२ देशांना हादरवलं! त्सुनामीचा अलर्ट जारी
19
भारताच्या 'या' राज्यात तब्बल २७७९ पुरुषांनी केलेत दोनपेक्षा अधिक विवाह! सरकारी योजनेतून झाला मोठा खुलासा
20
महिलेचा कारनामा, एकाच वेळी २० युवकांना लावला चुना; प्रेमात फसवून प्रत्येकाकडून iPhone घेतले, मग...

कोल्हापूर: एस.टी. बसखाली सापडून शेतकरी ठार, ऐन सणासुदीत दिंडोर्ले कुटुंबियांवर कोसळला दु:खाचा डोंगर

By तानाजी पोवार | Updated: August 30, 2022 17:47 IST

बसमध्ये चढत असतानाच बस अचानक सुरु होऊन पुढे गेली, त्यामुळे धक्का बसून दिंडोर्ले खाली रस्त्यावर पडले. दरम्यान बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले.

कोल्हापूर : एस.टी. बसच्या मागील चाकाखाली सापडून नंदगाव (ता. करवीर) येथील शेतकरी जागीच ठार झाला. शिवाजी शंकर दिंडोर्ले (वय ६६ रा. नंदगाव, ता. करवीर) असे त्यांचे नाव आहे. ही दुर्घटना आज, मंगळवारी दुपारी संभाजीनगर एस.टी. आगारात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे ऐन सणासुदीत दिंडोर्ले कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला.घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवाजी दिंडोर्ले हे कुशल शेतकरी असून घरगुती कामानिमीत्त मंगळवारी सकाळी कोल्हापूरात आले होते. दुपारी नंदगावला जाण्यासाठी शाहू मैदान येथे एस.टी. बसमध्ये बसले. पुढे बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांसह बस ही चालकाने संभाजीनगर आगारात नेली. त्यानंतर त्या बसमधील प्रवाशांना दुसर्या बसमध्ये बसण्याचे आवाहन केले.नंदगावकडे जाणारी दुसरी बस फलाटवर उभी होती, त्यात प्रवासी चढत होते. शिवाजी दिंडोर्ले हेही बसमध्ये चढत होते. त्यावेळी बस सुरु होऊन पुढे गेली, त्यामुळे धक्का बसून बसमध्ये चढणारे शिवाजी दिंडोर्ले हे दरवाजातून खाली रस्त्यावर पडले, काही समजण्यापूर्वीच बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने ते जागीच ठार झाले.दुर्घटनेनंतर गोंधळ उडाल्याने आगारातील प्रवासी व एस.टी. कर्मचारी घटनास्थळी धावले. दिंडोर्ले यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, दोन विवाहीत मुली असा परिवार आहे. दुर्घटनेनंतर दिंडोर्ले यांचे नातेवाईक संतप्त झाले, त्यांनी बस चालकाच्या चुकीमुळे हा अपघात घडल्याचा आरोप केला. या दुर्घटनेबाबत जुना राजवाडा पोलीस ठाण्यात एस,टी. बसचालक साताप्पा पाटील यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघात