शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून फसवणुक: केनियन गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:55 IST

इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी

ठळक मुद्देबांधकाम व्यावसायिकाकडे ६३ लाखांची मागणी

कोल्हापूर : इचलकरंजीतील बांधकाम व्यावसायिकास परदेशी चलन दुप्पट करण्याचे आमिष दाखवून ६३ लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या केनियन नागरिकास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने छापा टाकून मुसक्या आवळल्या. मुथाय इसाह (वय ४५, रा. कॉलेज रोड, युनायटेड नेशन अ‍ॅव्हेन्यूजवळ, नैरोबी, केनिया) असे संशयिताचे नाव आहे.

त्याच्याकडून भारतीय चलनातील १३ हजार रुपये, २०० अमेरिकन डॉलर, २०० व ३०० युरोज असे परकीय चलन, २२ कागदाचे बंडलामध्ये प्रत्येकी १०० युरोजचे आकाराचे कागद असे एकूण २ हजार २०० कागद, केमिकल्स, चिकट टेप, गम, हॅण्डग्लोज, कापूस, मास्क, पाच मोबाईल, आदी साहित्य जप्त केले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

संशयित मुथाय इसाह हा चार महिन्यांपूर्वी मुंबईत आला. त्याने सोशल मीडियावरून मुंबई, पुणे, कोल्हापूर, इचलकरंजी परिसरात ज्यांचे आर्थिक व्यवहार मोठे आहेत, त्यांची यादी तयार केली. त्यानंतर तो कोल्हापुरातील एका हॉटेलमध्ये चार दिवसांपूर्वी उतरला. त्याने बांधकाम व्यावसायिक अभिजित हंबीरराव खराडे (वय २९, रा. कुडचे मळा, तीन बत्ती चौक, इचलकरंजी) यांची भेट घेतली. आपण मोठ्या रकमेची व्यवसायामध्ये गुंतवणूक करणार असल्याचा बहाणा करून त्यांच्याशी जवळीक साधली. खराडे यांना आपलेकडे स्वीस बँकेकडून मोठ्या प्रमाणात अदृश स्वरूपात असणारे काळे रंगाचे कागदी डॉलर भारतीय चलनानुसार मोठ्या प्रमाणात आहेत. तसा पैसा मी घेऊन आलो आहे; परंतु परदेशी पातळीवर चलन सुरक्षितता म्हणून ते काळे करून दिले जाते. कागदी चलनाचे बंडलामधील काळा कागद काढून हातचालखीने बरोबर असलेल्या केमिकलमध्ये धुवून ५०० युरोज हे चलन दाखवून ते खराडे यांच्याकडे दिले. त्याचे भारतीय चलनामध्ये रूपांतरित करून खराडे यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आपल्याकडे २० मिलियन युरोज असून, त्याची भारतीय चलनाप्रमाणे १६ कोटी रुपये किंमत होते, असे सांगून ते युरोजचे रूपांतर करावयाचे झाल्यास त्यासाठी लागणारे केमिकल व अन्य साहित्याचा खर्च ६३ लाख रुपये येणार आहे.

त्याकरिता मला पैशाची आवश्यकता असून, तुम्ही दिल्यास त्या मोबदल्यात ३ कोटी २० लाख रुपये देऊन बिझनेसमध्ये गुंतवणूक करीन असे सांगितले. इसाह याच्या सांगण्यावर खराडे यांना संशय आला. त्यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.साडेआठ कोटींचा गंडा घालण्याचा कटपोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता तो पोपटासारखा बोलू लागला. त्याला मराठीही बोलता येत असल्याने त्याचे मुंबईमध्ये अनेक महिन्यांपासून वास्तव्य असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याजवळ मिळालेल्या यादीमध्ये पन्नासपेक्षा जास्त व्यापारी लोकांची नावे होती. या सर्वांशी तो संपर्क साधून बनावट परदेशी नोटा त्यांच्या गळ्यात मारून सुमारे ८ कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक करण्याचा त्याचा कट होता.रडण्याचे नाटक

इसाह उतरलेल्या हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी तो खराडे यांच्याकडून पैसे घेऊन पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी रूममध्येच खाक्या दाखवताच त्याने फसवणुकीच्या प्लॅनची कबुली दिली. रूममध्येच बनावट परदेशी चलनी नोटांचे कागद, केमिकलसह अन्य साहित्य असलेली पेटी पोलिसांनी जप्त केली. प्रसारमाध्यमांचे छायाचित्रकार फोटो काढत असताना तो चेहरा लपवित होता. त्याच ठिकाणी त्याने रडण्याचे नाटक केले.परदेशी गुन्हेगार मुथाय इसाह याच्या ताब्यातून पोलिसांनी जप्त केलेल्या परदेशी चलनाच्या बनावट नोटा व साहित्य.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजीkolhapurकोल्हापूर