शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

Zero Shadow Day कोल्हापूरकरांनी अनुभवला, भरदुपारी सावली गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 17:30 IST

भरदुपारी सावली गायब होण्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी सोमवारी घेतला. ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) असल्याने दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत सावली नाहीशी झाली. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. काहींनी व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टेटस्वर ठेवली.

ठळक मुद्दे भरदुपारी सावली गायब. कोल्हापूरकरांनी अनुभवला ‘झिरो शॅडो डे’खगोलशास्त्र अभ्यासक, विद्यार्थ्यांनी नोंदविली निरीक्षणे

कोल्हापूर : भरदुपारी सावली गायब होण्याचा अनुभव कोल्हापूरकरांनी सोमवारी घेतला. ‘झिरो शॅडो डे’ (शून्य सावली दिवस) असल्याने दुपारी १२ वाजून २९ मिनिटांपासून ५२ सेकंदांपर्यंत सावली नाहीशी झाली. अनेकांनी सावली गायब झाल्याची छायाचित्रे, व्हिडिओ टिपून ती सोशल मीडियावरून शेअर केली. काहींनी व्हॉटस् अ‍ॅपच्या स्टेटस्वर ठेवली.पृथ्वी सूर्याभोवती फिरता फिरता ती स्वत:भोवतीसुद्धा फिरते. ती स्वत:भोवती ज्या अक्षातून फिरते, तो अक्ष उभा नसून २३.५ अंशातून कललेला आहे; त्यामुळे सहा महिने सूर्य उत्तरेकडे सरकताना दिसतो, त्याला ‘उत्तरायण’ असे म्हणतात, तर सहा महिने तो दक्षिणेकडे सरकताना दिसतो त्याला ‘दक्षिणायन’ असे म्हणतात.

उत्तरेकडे सरकताना एकदा तर दक्षिणेकडे सरकताना एकदा असा वर्षातून दोनवेळा सूर्य बरोबर आपल्या डोक्यावर असतो. त्या वेळी तो आकाशाच्या घुमटाच्या अत्युच्य बिंदूवर असतो आणि त्याची किरणे त्या ठिकाणी लंबरूप पडतात, परिणामी कोणत्याही वस्तूची सावली बरोबर त्या वस्तूच्याच खाली पडते आणि दिसेनाशी होते. या घटनेला ‘झिरो शॅडो’ म्हणतात. त्या घटनेचा अनुभव कोल्हापूरकरांनी सोमवारी घेतला.

विविध मंदिरांची दीपमाळ, आपली वाहने, विद्युत खांब, आदींची सावली दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी गायब झाली. साधारणत: अर्ध्या मिनिटाने सावली पुन्हा पूर्वेकडे सरकू लागली.

दरम्यान, विवेकानंद महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे प्रा. डॉ. मिलिंद कारंजकर यांच्या मार्गदर्शनाखाली पदार्थविज्ञान विभागाचे विद्यार्थी सौरभ पाटील, सतीश पाटील, अनिकेत चिले यांनी अंबाबाई मंदिराच्या घाटी दरवाजाजवळील दीपमाळेजवळ नागरिकांना ‘शून्य सावली’ दिवसाची माहिती दिली.

रिटॉर्ड स्टँड, पॉर्इंटर, आदींची मांडणी करून त्या साहित्याची सावली कशी गायब झाली ते प्रात्यक्षिकांसह दाखविले. दीपमाळेची सावली नाहीशी झाल्याचा अनुभव तेथील लोकांनी घेतला. खगोलशास्त्राचे अभ्यासक डॉ. अविराज जत्राटकर यांनी सोळांकूर येथून, विशाल पंडित यांनी कागल, तर सुनील पाटील, गौतम जिरगे यांनी कोल्हापूरमधून विद्यार्थ्यांसमवेत ‘झिरो शॅडो डे’ची निरीक्षणे नोंदविली.

आता सहा आॅगस्टला संधीमहाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या ठिकाणी सोमवारनंतर विविध दिवशी ‘शून्य सावली’चा अनुभव घेता येणार आहे. कोल्हापुरात पुन्हा दि. ६ आॅगस्ट रोजी ‘शून्य सावली’ दिवसाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रा. कारंजकर यांनी दिली.

 

 

टॅग्स :Zero Shadow Dayशून्य सावली दिवसkolhapurकोल्हापूर