शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘फेक न्यूज : सत्यता पडताळूनच बातमी शेअर करा  : विनायक पाचलग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 13:17 IST

समाज माध्यमांवर एखादी माहिती, फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार व निरीक्षण करा, सत्यता पडताळा त्यांच्या परिणामांचा विचार करूनच ती पोस्ट शेअर केल्यास फेक न्यूजच्या प्रचाराची गती रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी केले.

ठळक मुद्दे‘फेक न्यूज : सत्यता पडताळूनच बातमी शेअर करा : पाचलग‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ विषयावर कार्यशाळा

कोल्हापूर : समाज माध्यमांवर एखादी माहिती, फोटो तसेच व्हिडीओ व्हायरल करण्यापूर्वी क्षणभर थांबा, विचार व निरीक्षण करा, सत्यता पडताळा त्यांच्या परिणामांचा विचार करूनच ती पोस्ट शेअर केल्यास फेक न्यूजच्या प्रचाराची गती रोखणे शक्य आहे, असे प्रतिपादन सोशल मीडिया तज्ज्ञ विनायक पाचलग यांनी केले.जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हास्तरीय सायबर सेल आणि कोल्हापूर प्रेस क्लबतर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावर कार्यशाळेत ते बोलत होते, यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, माहिती उपसंचालक सतीश लळीत, पोलीस उपअधीक्षक सतीश माने, प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील, जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने उपस्थित होते.पाचलग म्हणाले, ‘देशात इंटरनेट वापरण्याचे प्रमाण २७ टक्के असून ते झपाट्याने वाढत आहे. देशातील २२ कोटी लोक फेसबुक, तर १७ कोटी जनता व्हॉटस्अपचा वापर करतात. समाजकंटक आपला हेतू साध्य करण्यासाठी या समाज माध्यमांचा वापर करतात.

सोशल मीडिया वापरणारी व्यक्ती पोस्टची सत्यता पडताळत नाहीत; त्यामुळे समाजात संभ्रमाची अवस्था निर्माण होते. सोशल मीडियाचा वापर करताना थिंक व्टॉईस हा मंत्र अवलंबणे गरजेचे आहे. अशा पोस्टची त्या-त्या क्षेत्रांतील तज्ञांंकडून सत्यता पडताळल्यास फेक न्यूज रोखणे शक्य आहे.सतीश लळीत म्हणाले,‘सामाजिक सलोखा नष्ट करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फेक न्यूज रोखणे अवघड असले, तरी त्या शेअर न करणे शक्य आहे.’ जिल्हा माहिती अधिकारी एस. आर. माने यांनी स्वागत केले. प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अंबऋषी फडतरे यांनी परिचय करून दिला. प्रेस क्लबचे उपाध्यक्ष समीर मुजावर यांनी आभार मानले.

 

 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाkolhapurकोल्हापूर