शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
4
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
5
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
6
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
7
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
8
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
9
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
10
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
11
संपादकीय : विरोधकांशी बोलणार कोण? विरोधकांच्या प्रश्नांवर सरकारची चुप्पी आणि संसदीय कोंडी
12
जशी नोटाबंदी, टाळेबंदी.. तशीच नवी ‘व्होटबंदी’! निवडणूक आयोगाच्या नव्या मतदार यादी मोहिमेचे विच्छेदन
13
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
14
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
15
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
16
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
17
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
18
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
19
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
20
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  

ओगलेवाडीत २९ लाखांच्या बनावट नोटा जप्त

By admin | Updated: May 7, 2014 13:33 IST

फोटो नेम : 0६0५२0१४सॅट-५१/५२

फोटो नेम : 0६0५२0१४सॅट-५१/५२फोटो ओळी : कर्‍हाड तालुका पोलिसांनी ओगलेवाडी येथे छापा टाकून २९ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. बळीराम कांबळेला पोलिसांनी अटक केली. (छाया : माणिक डांेगरे)एकास अटक : नाकाबंदीवेळी एक तर घरात आढळले २८ लाखकर्‍हाड : कर्‍हाड शहरालतग असणार्‍या ओगलेवाडी येथे एका घरावर छापा टाकून पोलिसांनी २९ लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या. याप्रकरणी बळीराम श्रीपती कांबळे, वय ३२ याला कर्‍हाड तालुका पोलिसांनी अटक केली. दरम्यान, यामध्ये आणखी काही जणांचा यामध्ये हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. कर्‍हाड तालुका पोलिसांनी सोमवारी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. नाकाबंदीदरम्यान वाहने व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्याचे काम सुरू होते. पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे, उंब्रजचे सहायक पोलीस निरीक्षक एम. के. पाटील टेंभू येथे तपासणी करीत होते. यानंतर ते वाघेरी येथील सावकार दत्तू गुरव या रेकॉर्डवरील गुन्हेगाराची तपासणी करण्यास जाणार होते. याचवेळी नाकाबंदीपासून काही अंतरावर एकजण दुचाकी वळवून वेगाने निघून जात असल्याचे पोलिसांना दिसले. उपनिरीक्षक गर्जे यांनी पाठलाग करून काही अंतरावर त्याला पकडले. चौकशीअंती त्याचे नाव बळीराम कांबळे असल्याचे समजले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एक लाखाची रोकड सापडली. या नोटा बनावट असण्याचा संशय आल्यामुळे पोलिसांनी बळीरामला तालुका पोलीस ठाण्यात आणले. पोलीस उपअधीक्षक मितेश घ˜े यांनी त्याच्याकडे कसून तपास सुरू केला. मंगळवार, दि. ६ रोजी सकाळी या नोटा स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांनी तपासल्या असता त्या बनावट असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी बळीरामकडे अधिक चौकशी सुरू केली आणि त्याच्या ओगलेवाडी येथील घरावर छापा टाकला. येथे तब्बल २८ लाखांच्या बनावट नोटा पोलिसांना आढळून आल्या. सर्व नोटा पोलिसांनी जप्त केल्या. सर्व नोटांचे नंबर तपासले असता अनेक नोटांवर एकच क्रमांक दिसून आला. बंडलमधील सर्व नोटा एक हजाराच्या असून कागदही अतिशय निकृष्ट आहे.बळीरामने या नोटा कोठून आणल्या, याचा तपास सुरू आहे. यामध्ये आणखी काहीजणांचा हात असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीनेही पोलीस कसून तपास करत असल्याची माहिती उपअधीक्षक मितेश घ˜े यांनी दिली. दरम्यान, या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक रमेश गर्जे, प्रकाश खाडे, रवी शिंदे यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी सायंकाळी कर्‍हाड येथे बनावट नोटांची पाहणी केली. - चौकटसांगली प्रकरणात बळीरामला शिक्षाबळीरामला काही वर्षांपूर्वी सांगलीत बनावट नोटा प्रकरणी अटक झाल्यानंतर शिक्षाही झाली आहे. २००५ मध्ये कर्‍हाडात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आले होते. त्यामध्ये बळीरामचा सहभाग असावा, असा पोलिसांना संशय आहे.चौकट करणेनोटा कोणाला देणार होता...सोमवारी रात्री बळीराम एक लाखाच्या नोटा घेऊन कर्‍हाडच्या दिशेने येत होता. त्यामुळे तो कर्‍हाडात कोणाला तरी त्या नोटा देण्याच्या प्रयत्नात होता. मात्र, त्यापूर्वीच त्याला पकडण्यात आले. तो कोणाला नोटा देणार होता, याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.