शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उसाला चारशेच्या हप्त्याला कारखानदारांचा नकार, स्वाभिमानी आक्रमक; बैठक निष्फळ 

By भीमगोंड देसाई | Updated: October 12, 2023 15:40 IST

आरएसएफच्या सूत्रानुसारच पैसे देण्याची भूमिका

कोल्हापूर : गेल्या हंगामातील उसाला ४०० रूपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना साखर रोखण्याचे आंदोलन करीत असल्याने जिल्हा प्रशासनाने यातून मार्ग काढण्यासाठी आज, गुरूवारी आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली. बैठकीत सर्वच साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींनी ऊस उत्पादकांना उत्पन्न वाटप सूत्रानुसार (रेव्ह्यून्यू शेअरींग फॉम्युला-आरएसएफ) पैसे देवू असे सांगत ४०० रूपये देण्यास नकारघंटा वाजवली. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी संघर्षाशिवाय शेतकऱ्यांना काहीही मिळणार नसेल तर ४०० रूपयांसाठी साखर रोखण्याचे आंदोलन आणखी तीव्र करू, एक कणही साखर बाहेर सोडणार नाही, असा खणखणीत इशारा दिला. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्हाधिकारी राहूल रेखावार, प्रादेशिक साखर सहसंचालक अशोक गाडे, उपसंचालक जी. जी. मावळे यांची प्रमुख उपस्थिती होती.शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने साखरेला प्रतिक्विंटल ३३०० रूपये दर ठरवून दिला आहे. पण प्रत्यक्षात कारखानदार जादा पैशांची खुल्या बाजारात साखर विक्री करीत आहेत. एफआरपी देवूनही कारखानदारांकडे पैसे शिल्लक आहेत. आता शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. यामुळे ४०० रूपयांच्या दुसऱ्या हप्त्याची मागणी केली आहे. या मागणीसाठीसाठी मोर्चा काढला. निवेदने दिली. तरीही कारखानदार काहीही बोलायला तयार नाहीत. म्हणून साखर अडवण्याचे आंदोलन सुरू आहे. आतापर्यंत आम्ही कायद्याचा आदर करून आंदोलन शांततेच्या मार्गाने करीत आहोत. कारखानदार पैसेच देणार नसतील तर प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखानेcollectorजिल्हाधिकारी