शहरं
Join us  
Trending Stories
1
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
2
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
3
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
4
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
5
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
6
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
7
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
8
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
9
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
10
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
11
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
12
AUS vs ENG: डोक्यात निवृत्तीचा विचार, मनात भीती… आणि त्यानेच सामना फिरवला!
13
कौतुकास्पद! आईने दागिने विकून शिकवलं, १० वेळा अपयश आलं पण लेकाने वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं
14
विराट कोहलीचा VIDEO घेण्यासाठी बस ड्रायव्हरची भन्नाट 'आयडिया', सोशल मीडियावर क्लिप VIRAL
15
राजकारण पेटलं! कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारची बुलडोझर कारवाई; ४०० हून अधिक घरं पाडली
16
शाकंभरी नवरात्र २०२५: शाकंभरी मातेच्या कृपेने 'या' राशींचे उजळणार भाग्य; २०२६ ची होणार स्वप्नवत सुरुवात!
17
"भाजपाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला, मतदारांचाही विश्वासघात करेल"; राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुळीक यांचे टीकास्त्र
18
Battle Of Galwan Teaser: मौत से क्या डरना...! 'बॅटल ऑफ गलवान'चा टीझर, 'या' दिवशी सिनेमा रिलीज होणार
19
जिवलग जीवाचा... विराट कोहली!! स्वत:चीच विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला दिलं एकदम खास 'गिफ्ट'
20
सोन्या-चांदीची भरारी, विदेशींची माघार अन् भारतीयांचा एल्गार! हे वर्ष कोणासाठी ठरलं फायद्याचं
Daily Top 2Weekly Top 5

असळजमध्ये चित्र अस्पष्ट तरीही उमेदवारीसाठी रस्सीखेच

By admin | Updated: January 10, 2017 23:23 IST

‘तू.. तू.. मैं.. मैं..’ होण्याची शक्यता : उमेदवारांची निवड करताना नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार

चंद्रकांत पाटील --- गगनबावडा --मागील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत असळज मतदारसंघ इतर मागास महिला प्रवर्ग आरक्षित राहिल्याने अनेकांच्या पदरी निराशा पडली होती. २००७ नंतर पुन्हा २०१७ ला या मतदारसंघाचे आरक्षण खुले झाल्याने उमेदवारीसाठी मोठीच रस्सीखेच असणार आहे. उमदवारीसाठी ‘तू.. तू.. मैं.. मंै..’ होण्याच्या दाट शक्यतेने उमेदवार निवडीसाठी नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.गगनबावडा तालुक्याचे राजकारण हे नेहमी गटा-तटाभोवती फिरत असल्याने इथे पक्षीय राजकारणाला फारसे महत्त्व नाही. विधानसभा, लोकसभा व जिल्हा परिषदेसारख्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे कोण कार्यकर्ता कोणत्या गटात सक्रीय आहे, हे शेवटपर्यंत समजतच नाही. असे असले तरी के.डी.डी.सी.सी. बॅँकेचे संचालक पी. जी. शिंदे, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके यांच्या नावानेच गट-तटाचे राजकारण होत असते. आतापर्यंत हा मतदारसंघ आमदार सतेज पाटील यांच्या वर्चस्वाखाली कॉँग्रेसचा बालेकिल्ला ठरला आहे.पी. जी. शिंदे यांनी राष्ट्रवादीला रामराम करून भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे यावेळच्या निवडणुकांना वेगळे स्थान मिळाले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राष्ट्रवादी खिळखिळी झाली असून, घड्याळाचे काटे बंद पडले आहेत. असे असले तरी पी. जी. शिंदे गटाला अपवाद वगळता या मतदारसंघात फारसे यश मिळाले नाही. कॉँग्रेसने मात्र २००२ मध्ये वसुंधरा पाटील, २००७ मध्ये संभाजीराजे पाटणकर व २०१२ मध्ये प्रिया वरेकर यांनी सरळ लढतीत बाजी मारली होती. तर असळज पंचायत समितीमधून संभाजी कुंभार, सरिता पाटील व तानाजीराजे पाटणकर यांनी विजय मिळविला होता. अपवाद कातळी मतदारसंघाचा असून, पी. जी. शिंदे गटाने २००२ मध्ये राष्ट्रवादी पक्षातून कमल काटेंच्या रूपाने व २००७ मध्ये जनस्वराज्य पक्षातून भारती कांबळेच्या रूपाने विजय मिळविला होता. मात्र, २०१२ च्या निवडणुकीत शालिनी शेळके यांनी कॉँग्रेसचा झेंडा फडकावून पी. जी. शिंदे गटाला धक्का दिला होता. सेनेला मात्र पराभूत व्हावे लागले होते.यावेळी पी. जी. शिंदे यांच्या मागे भाजपची जरी कुमक असली, तरी गजानन चौधरी व बंडू आप्पा पडवळ यांच्यासारखे खंदे कार्यकर्ते कॉँग्रेसमध्ये दाखल झाल्यामुळे कॉँग्रेस येथे अधिकच मजबूत झाली आहे. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावणे आता सोपे राहिलेले नाही. त्यामुळे या निवडणुकीत त्यांचे पारडे अधिकच जड झाले आहे. विजयाच्या निश्चिततेमुळे या मतदारसंघातून अनेक इच्छुकांनी जरी मोर्चेबांधणी केली असली तरी मानसिंग पाटील व संभाजी पाटणकर यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. संधी मिळाल्यास कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष बजरंग पाटीलही येथून लढण्यास तयार आहेत. भाजपमधून नंदू पवार यांचे नाव पुढे येत असून, राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे मात्र शांत आहेत. सेनेतून तानाजी पाटील इच्छुक आहेत.विधानसभेच्या निवडणुकीत घातलेला भक्कम पाया मागील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ढासळल्यामुळे शिवसेनेला जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये पराभवाचा धक्का बसला होता. प्रत्येक निवडणुकीत घेतली जाणारी कार्यकर्त्यांची वेगळी भूमिका सेनेला घातक ठरल्यामुळे त्यांनी यावेळी सावध भूमिका घेऊन पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे आमदार चंद्रदीप नरके, आमदार सतेज पाटील गट व पी. जी. शिंदे गट यांच्या भूमिकेकडे लक्ष ठेवून आहेत.असळज गण मागास महिला वर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे सर्वच पक्षांना येथे धावाधाव करावी लागते आहे. सक्षम उमेदवारांच्या शोधात नेतेमंडळी असून, आपली भूमिका मात्र त्यांनी गुलदस्त्यात ठेवली आहे. कातळी गणातून कॉँग्रेसमधून एम. जी. पाटील व संजय पाटील यांच्या नावांची चर्चा असून, भाजपमधून आनंदा पाटील हे नाव पुढे आहे. शिवसेनेने मात्र यावेळी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारीबाबत गुप्तता पाळल्यामुळे त्यांचे उमेदवार कोण, यांचे तर्कवितर्क लढविले जात आहेत; पण कार्यकर्त्यांच्या नावांची कितीही चर्चा झाली तरी अंतिम नाव मात्र नेतेमंडळीच सुचवतील ते नक्की असते, हे आजवरचे चित्र आहे.प्रत्येक गटाने पडद्यामागून हालचाली सुरू केल्या आहेत. तिरंगी लढत की युती करून एकमेकाला शहकाटशह अशी ही खेळी होऊन समोरच्याला नामोहरम करण्याचा डावही टाकला जाण्याची शक्यता आहे; पण ही युती कोण कोणाबरोबर करणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे.असळज जि. प. मतदारसंघातील गावे असळज, पळसंबे, वेसरफ, शेणवडे, खोकुर्ले, अणदूर, सांगशी, सैतवडे, पारगावकरवाडी, गगनबावडा, जांभुळणेवाडी, धुंदवडे, चौधरवाडी, बेरिवडे, शेळशी, जर्गी, कडवे, बावेली, बोरबेट, गारिवडे, कातळी, नरवेली, लखमापूर, तळये खुर्द.