शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

दर्जेदार शिक्षणासाठी सोयीसुविधा देणार : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 17:08 IST

जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.

ठळक मुद्देदर्जेदार शिक्षणासाठी सोयीसुविधा देणार : हसन मुश्रीफजिल्हा परिषदेत विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वितरण

कोल्हापूर : यापुढच्या काळात खासगीसह इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळांना उतरावे लागेल. त्यासाठी आवश्यक मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी महाराष्ट्र शासन बांधील असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.जिल्हा परिषदेत आयोजित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रमावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार संजय मंडलिक, अध्यक्ष बजरंग पाटील, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव उपस्थित होते.मुश्रीफ म्हणाले, कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीमुळे मी चिंतेत आहे. रस्त्यावरचा एखादा खड्डा दुरुस्त करता येईल; परंतु विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाणे योग्य नाही. ऑनलाईन शिक्षणाची चर्चा होत असली तरी आजही अनेक पालकांकडे त्यासाठीचे आवश्यक मोबाईल नाहीत, ज्यांचे हातावर पोट आहे असे पालक मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही. अशांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये, अशी आमची इच्छा आहे.यावेळी सभापती हंबीरराव पाटील, डॉ. पद्माराणी पाटील, स्वाती सासने, पंचायत समितीच्या सभापती अश्विनी धोत्रे, रूपाली कांबळे, संगीता पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, अजयकुमार माने, रविकांत आडसूळ यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांनी स्वागत केले; तर उपशिक्षणाधिकारी बी. एम. कासार यांनी आभार मानले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर