शहरं
Join us  
Trending Stories
1
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
2
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
3
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?
4
तेल ते टेलिकॉमपर्यंत... उद्योगपती मुकेश अंबानींचं साम्राज्य किती मोठं? इतक्या कंपनीचे आहेत मालक
5
महाराष्ट्रातील ४-५ मंत्र्यांना मिळणार डच्चू?; संजय राऊतांचा दावा, एका मंत्र्याचं नावही सांगितले
6
लँडिंगची तयारी अन् अचानक उड्डाण; दोन विमानांच्या २५ मिनिटे आकाशात! इंडिगोच्या विमानांमध्ये प्रवाशांचा थरकाप
7
शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित, कृषीमंत्री ‘रमी’ खेळण्यात मग्न; रोहित पवारांनी व्हिडिओच दाखवला
8
"दिवसाला ८ शेतकरी आत्महत्या अन् कृषिमंत्री विधानसभेत बसून रमी खेळतायेत, लाज वाटत नाही का?"
9
'स्लीपिंग प्रिन्स'ची २० वर्षांची लढाई संपली! वडिलांनी लाईफ सपोर्ट काढण्यास दिला होता नकार!
10
ओडिशात नराधमांनी किशोरवयीन मुलीला पेटवले, ७० टक्के भाजल्याने प्रकृती गंभीर
11
Live in Partner Murder: 'एएसआय' लिव्ह पार्टनरची हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण
12
भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले...
13
विधानसभा विरोधी पक्षनेतेपद रिकामेच, आता नागपूर अधिवेशनापर्यंत प्रतीक्षा!
14
ठाकरे बंधू एकत्रच, कुणाला काय प्रॉब्लेम?, मी आणि राज एकत्र आल्यानं..."; उद्धव ठाकरे कडाडले
15
सभागृहाबाहेरच्या कारनाम्यांनी सरकारची अधिवेशनातील कामगिरी झाकोळली!
16
महाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या निवडणुकीत 'सहकार पॅनेल'ची आघाडी: २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध
17
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘भक्तशिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार’ जाहीर
18
भारताची ताकद जग बघेल! शुभांशू शुक्लांच्या अनुभवातून गगनयानला बळ, स्वदेशी मोहिमेची तयारी
19
यूट्यूबवरून आयडिया मिळाली; क्यूआर कोड बदलून दुकानदारांची फसवणूक केली
20
ड्रग्ज विक्रीसाठी आलेले सहा जण अटकेत, ५४ लाख ४६ हजार रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त

चेहरा रंगवा स्पर्धेत वसुप्रिया, सानव्ही प्रथम

By admin | Updated: March 9, 2015 23:44 IST

निसर्गमित्र संस्थेचा उपक्रम : वनस्पतीजन्य रंगनिर्मितीचे प्रात्यक्षिक सादर

कोल्हापूर : नेहमीच्या वापरातील फळभाज्या, फुले यापासूनसुद्धा तयार केलेल्या नैसर्गिक रंगांनी चेहरा रंगविणे स्पर्धेत वसुप्रिया वेल्हाळ व सानव्ही लोखंडे यांनी आपापल्या गटांत प्रथम क्रमांक पटकाविला. यावेळी निसर्ग मित्र संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी घरच्या घरी रंग तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. ते पाहून मुले व पालक भारावून गेले. निसर्ग मित्र संस्था व नाईस प्ले ग्रुपच्यावतीने या वनस्पतीजन्य रंगांनी चेहरा रंगविणे स्पर्धेचे आयोजन केले होते. मंगळवार पेठेतील बेलबाग येथे या स्पर्धेदरम्यान देवासाठी वाहिलेल्या हारांची फुले, जेवणासाठी वापरणारे बीट, हळकुंड, डाळिंब यापासून रंगांची निर्मिती कशी होते, याची सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थित मुले व पालकांना हे वनस्पतीजन्य रंग तयार करून दाखविले. स्पर्धेमध्ये दोन गट केले होते. पहिला गटात स्वत: नैसर्गिक रंग तयार करून चेहरा रंगविणे व दुसऱ्या गटात तयार केलेला नैसर्गिक रंग घेऊन चेहरा रंगविणे अशी स्पर्धा घेतली. या स्पर्धेत एकूण ४५ विद्यार्थी सहभागी झाले होते. परीक्षक म्हणून अर्चना देसाई, दीप्ती वर्दम, अनुराधा मेहता यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन प्रेमा श्रीखंडे, वनिता चव्हाण, राणिता चौगुले, अजित अकोळकर, भरत चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)स्पर्धेचा गटनिहाय निकाल पहिला गट : वसुप्रिया वेल्हाळ, जान्हवी कांबळे, तिसरा क्रमांक विभागून अनुश्का पाटील व हरीष पवार, तर उत्तेजनार्थ वरद पिसाळ. दुसरा गट : सानव्ही लोखंडे, राजवीर पवार, दर्श हवळ, उत्तेजनार्थ आराध्य पाटील. आपण स्वत: वनस्पतीजन्य रंग तयार करून, रंगपंचमी खेळणे याचा आनंद वेगळाच आहे. या वनस्पतीजन्य रंगांमुळे कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही. रासायनिक रंगांतून होणारी विषबाधा टाळायची असेल, तर वनस्पतीजन्य रंगांत रंगपंचमी खेळणे उत्तम. त्यामुळेच बालपणापासून वनस्पतीजन्य रंगांचे महत्त्व मुलांना कळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले होते. - अनिल चौगुले, कार्यवाह, निसर्ग मित्र संस्था