शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

‘शिरोळ‘वर जिव्हाळा ‘करवीर’कडे कानाडोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:17 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात ...

राजाराम लोंढे,

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : कोराेनाच्या दुसऱ्या लाटेत सर्वाधिक रुग्ण हे करवीर तालुक्यात सापडले आहेत. आताही जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण याच तालुक्यात असताना लस वाटपात मात्र सापत्नभावाची वागणूक आरोग्य विभागाकडून दिली जात आहे. लोकसंख्या व रुग्ण पाहता आरोग्य राज्यमंत्र्यांच्या शिरोळ तालुक्यावर आरोग्य विभागाचा जरा अधिकच जिव्हाळा असून, ‘करवीर’कडे मात्र कानाडोळा केल्याने संतप्त भावना उमटत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेली तीन महिने सगळ्यांनाच मेटाकुटीला आणले आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी दक्षता घेणे गरजेचे आहेच, त्याचबरोबर लसीकरणही महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारने मोफत लसीकरण सुरू केले आहे. मात्र, त्याचा पुरवठा आणि डोस घेणाऱ्यांची संख्या पाहिली, तर फार मोठी तफावत आहे. मुळात सरकारकडून लस कमी मिळत आहेत. त्यातच लस वाटपात असमानता होत असल्याने सामान्य माणसाला लसीपासून वंचित राहावे लागत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यासाठी रविवारी लसीचे ४५ हजार डोस आले. त्याचे वाटप आरोग्य यंत्रणेने केले असून, यामध्ये हातकणंगले तालुक्याला सर्वाधिक ९,२००, शिरोळ तालुक्यासाठी ४,१६०, तर करवीर तालुक्याला ४,५६० डोस देण्यात आले आहेत. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीपासून करवीर तालुक्यात कोराेनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. रविवारीही तब्बल ५१४ रुग्ण एकट्या करवीरमधील आहेत. मात्र, त्या तुलनेत लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीविना नागरिकांना रांगेतूनच परत जावे लागत आहे.

येथेही शिरोळलाच झुकते माप

सरकारी यंत्रणेकडून कोरोनाची मोफत लस मिळत नसल्याने आरोग्य विभागाने खासगी रुग्णालयाला लस देण्यास परवानगी दिली आहे. येथेही हातकणंगले व शिरोळ तालुक्यांना प्रत्येकी बारा रुग्णालयांना परवानगी दिली आहे, त्या तुलनेत करवीरमधील पाच रुग्णालयांचा समावेश आहे.

कोट-

राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असताना आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या कोल्हापुरात मात्र वाढत आहे. रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याबरोबरच लसीकरणात ते अपयशी ठरले आहेत. ज्या तालुक्यात रुग्णसंख्या अधिक आहे, तिथे तरी जादा डोस देणे अपेक्षित असताना, येथेही दुजाभाव करणे योग्य नाही.

-बाबासाहेब देवकर (माजी सदस्य, जिल्हा परिषद)

रविवारची तालुकानिहाय रुग्णसंख्या आणि लसीचे डोस

तालुका रुग्ण आज मिळाला डोस

आजरा १०८ १,७१०

भुदरगड ९० १,८९०

चंदगड २० २,५६०

गडहिंग्लज ११२ ३,२८०

गगनबावडा ३ ५००

हातकणंगले ३२८ ९,२००

कागल १६७ २,५८०

करवीर ५१४ ४,५६०

पन्हाळा १३८ २,६४०

राधानगरी १३६ २,६६०

शाहूवाडी ७४ २,९२०

शिरोळ २२६ ४,१६०