शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
2
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
3
बांगलादेशात हिंदू नेत्याची अपहरण करून निर्घृण हत्या, भारताने केला तीव्र निषेध
4
लग्न झालं, वधूच्या डोक्यावरचा पदर उचलला, पाहतो तर काय, आत होती नवरीची विधवा आई, तरुणाची फसवणूक 
5
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? आम्हाला काहीच फरक पडणार नाही : शिंदेसेना
6
आजचे राशीभविष्य - २० एप्रिल २०२५, सर्व दृष्टींनी लाभदायी दिवस, सामाजिक क्षेत्रात सक्रीय राहाल
7
चोरीच्या संशयावरून नखे काढली, दिला विजेचा शॉक; छत्तीसगडमधील थरकाप उडवणारी घटना
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटला; निकाल लागणार ८ मे रोजी, अनेक अडथळे पार करत १७ वर्षांनंतर सुनावणी पूर्ण
9
जमीन मोजणी हरकतीवर आता केवळ दोनच अपील, मोजणी नकाशे अपलोड झाल्यानंतरच अंतिम निकाल
10
जेलमधून बाहेर येताच त्याने युवतीला पुन्हा पळवून नेले, तलवारी-रॉडने घरावर केला हल्ला
11
राजची साद अन् उद्धवचा प्रतिसाद; मराठीच्या धुरळ्यात ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा
12
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण: हॉस्पिटलच्या व्यवहारातून बेदखल केल्याने होता तणाव
13
मित्राला वाचविताना दोन सख्ख्या भावांनी गमावला जीव; वेळास समुद्रकिनाऱ्यावर तिघांचा बुडून दुर्दैवी मृत्यू
14
अवघ्या १७ दिवसांत ८३१ टन हापूस निर्यात; अमेरिकेला सर्वाधिक आंबा रवाना, युरोपाचीही पसंती
15
अवयवदात्याची स्वॅप रजिस्ट्री तयार करा, केंद्राच्या ‘नोटो’कडून सर्व राज्यांना सूचना
16
पावणेपाच लाखांचा घोटाळा; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीत बनावट कागदपत्रे, रुग्णनोंदी आढळल्या
17
अँटालिया स्फोटके प्रकरण: पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
18
कॅनडात बस स्टॉपवर भारतीय तरुणीची गोळीबारात हत्या; हल्लेखोरांना दुसऱ्यावर चालवायची होती गोळी
19
"ऑफर देणारे, अटी ठेवणारेही तेच, त्यामुळे मी..."; राज-उद्धव एकत्र येण्यावर CM फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
20
"जाऊ दे यार, कामाचं बोला"; राज-उद्धव एकत्र येण्याच्या प्रश्नावर एकनाथ शिंदे चिडले

राधानगरी अभयारण्यात अतिदुर्मिळ वाघाटीचे दर्शन, समृध्द जैवविविधतेवर शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2022 19:35 IST

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ परिसरातील वाघाटीचा वावर राधानगरीत असल्याचा हा पहिलाच अधिकृत पुरावा

संदीप आडनाईककोल्हापूर : सह्याद्रीमधील जैवविविधतेने समृध्द असलेल्या राधानगरी अभयारण्यात निशाचर अतिदुर्मिळ वाघाटीचे दर्शन घडले आहे. वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या वाघाटीचे छायाचित्र टिपण्यात आले. सह्याद्रीच्या पर्वतरांगेत प्रदेशनिष्ठ परिसरातील वाघाटीचा वावर राधानगरीत असल्याचा हा पहिलाच अधिकृत पुरावा या छायाचित्रामुळे मिळाला आहे.

राधानगरी अभयारण्यांत गतवर्षी झालेल्या प्राणीगणनेचा अहवाल गेल्याच महिन्यात कोल्हापूर वन्यजीव विभागाने प्रसिध्दीस दिला होता. यानुसार ३५१.१६ चौरस किलोमीटरपर्यंत पसरलेल्या या अभयारण्य क्षेत्रात सुमारे २७ तृणभक्षी प्राणी आढळले होते. अहवालानुसार मांसभक्षी प्राण्यांमध्ये बिबट्यासह जंगली कुत्रा, खवल्या मांजर, साळींदर, अस्वल यांच्या नोंदी केल्या असल्या तरी वाघाटीची नोंद मात्र झाली नव्हती.

वाघाटीच्या वावराचे राज्यात फक्त चार अधिकृत नोंदी आहेत. २०१७ मध्ये महाबळेश्वरमध्ये एका रस्ते अपघातात एका वाघाटीच्या मृत्यूची नोंद वन खात्याकडे होती. त्यानंतर २०१९ मध्ये दाजीपूरमध्ये वाघाटीचे दर्शन झाल्याची नोंद होती.

वाघाटी किंवा बिबट मांजर हे घरगुती मांजराच्या आकाराचे रानमांजर आहे. याचा रंग व अंगावरील ठिपके हे बिबट्याप्रमाणेच असतात व बिबट्याची हुबेहुब लहान प्रतिकृती हे मांजर दिसते. याचा वावर सह्याद्रीमधील कळसूबाईपासून कन्याकुमारीपर्यंतच्या पर्वतरांगेत आढळतो. या मांजराचा वावर प्रामुख्याने मानवी वस्तीच्या जवळ असतो. वाघाटी हा फेलिडो कूळातील कणाधारी सस्तन प्राणी आहे. हा मांसभक्षक प्राणी मात्र अतिदुर्मिळ आहे.

राधानगरीच्या अभयारण्यात प्रथमच वाघाटीच्या अस्तित्वाचा छायाचित्रित पुरावा मिळाला आहे. ज्यामुळे व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. राज्य सरकारने राधानगरीसह राज्यातील आठ वनपट्ट्यांना संरक्षण दिल्यामुळे सह्याद्रीमधील वन्यजीव सुरक्षित होणार असल्याचे म्हटले जात होते. आता त्यासंबंधीचा पुरावा हाती लागला आहे.

राधानगरीत येणाऱ्या पर्यटकांनी वाघ दिसल्याचे सांगितल्यानंतर राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)चे सुनील लिमये यांनी अभयारण्य परिसरात २० कॅमेरा ट्रॅप लावले होते. यातील ११ कॅमेऱ्यातून चांगली छायाचित्रे मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी रात्री या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघाटीचे छायाचित्र मिळाल्याची माहिती कोल्हापूर वन्यजीव विभागाचे वनाधिकारी तुषार माळी यांनी दिली आहे.मुख्य वनसंरक्षक डाॅ. व्ही बेन क्लेमंट यांनी 'लोकमत'ला सांगितले,की वाघाटीचे दर्शन म्हणजे राधानगरी अभयारण्यातील वन्यजीवांचा अधिवास सुरक्षित असल्याचे अधोरेखित होते. क्लेमेंट यांनी हे छायाचित्र ट्विटरवर प्रसिध्द केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरी