शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अंधश्रद्धेला कायद्याचा उतारा

By admin | Updated: May 31, 2014 01:10 IST

जादूटोणाविरोधात ६३ गुन्हे : महिलांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत वाढ

प्रवीण देसाई -कोल्हापूर जादूटोणाविरोधी कायदा मंजूर होण्यासाठी जिवाचे रान करणारे; प्रसंगी आपल्या जिवाचे बलिदान देणार्‍या महाराष्टÑ अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पश्चात हा कायदा झाला. त्यानंतर आतापर्यंत या कायद्यांतर्गत राज्यात ६३ गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये अंधश्रध्देच्या नावाखाली होणार्‍या महिलांच्या फसवणुकीचे गुन्हे निम्म्याहून अधिक आहेत. हा कायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी ‘अंनिस’ची धडपड सुरू आहे. २० आॅगस्ट २०१३ हा ‘काळा दिवस’ ठरला. पुण्यात ‘अंनिस’चे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या झाली. यानंतर २२ आॅगस्टला राज्य सरकारने या कायद्याचा वटहुकुम काढला. २६ आॅगस्टपासून तो जारी झाला. २० डिसेंबरला विधिमंडळाच्या अधिवेशनात हा कायदा मंजूर झाला. तोपर्यंत ३२ गुन्हे दाखल झाले होते. कायदा मंजूर झाल्यानंतर आतापर्यंत त्यात ३१ गुन्ह्यांची भर पडली. एकूण ६३ गुन्हे नोंद झाले आहेत. यातील पहिला गुन्हा नांदेडमधील भाग्यनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाला. एका मांंत्रिक बाबाच्या विरोधातील हा गुन्हा नोंद झाला आहे. संपूर्ण जगाला ‘पथदर्शक’ असणारा जादूटोणा व अंधश्रध्देविरोधातील हा कायदा राज्यातीलच नव्हे, तर जगातील पहिलाच कायदा आहे. अघोरी, अमानुष व अनिष्ठ अशा प्रकाराविरोधात थेटपणे कारवाई करण्याची क्षमता असलेला हा कायदा आहे. या कायद्यात १२ कलमे असून ती अगदी सुस्पष्ट आहेत. यापूर्वी अनेक कायदे सामाजिक प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी झाले आहेत. हे कायदे मंजूर होण्यासाठी त्यासाठी सामाजिक संस्था व संघटनांनी १०० टक्के पाठपुरावा केला आहे. परंतु या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी या संस्थांकडून १० टक्केही प्रयत्न झाले नाहीत. त्यामुळे या कायद्यांचा हेतू व उपयोगिता साध्य झालेली नाही. त्याचबरोबर प्रशासन व राज्यकर्ते यांचेही धोरण याबाबत उदासीन आहे. जादूटोणा विरोधातील या कायद्याचा हेतू चांगला आहे. परंतु इतर कायद्यांसारखी अवस्था या कायद्याची होऊ नये. यासाठी ‘अंनिस’ने राज्यव्यापी जनसंवाद यात्रा काढली. या यात्रेच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधून या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत समाजमन तयार करण्याचे काम सुरू आहे. या यात्रेला ९ मार्चला महाडच्या चवदार तळे येथून सुरुवात झाली. राज्यातील ३५ जिल्ह्यांमधून फिरून ही यात्रा गुरुवारी कोल्हापुरात आली. या ठिकाणीच समारोप होत आहे. यात्रेतील सजविलेल्या वाहनावर कायद्याविषयी प्रबोधन करणारे फलक लावण्यात आले होते. ८५ दिवसांच्या काळात कार्यकर्त्यांनी ३००हून अधिक प्रबोधनपर कार्यक्रम घेतले. यामध्ये या कायद्याबाबत नागरिकांचे गैरसमज दूर करणे, पोस्टर प्रदर्शन, पुस्तक प्रदर्शन व चमत्कार सादरीकरण झाले. या वाहनात ४ प्रशिक्षित कार्यकर्ते होते. ते या कायद्याबद्दल दृक्श्राव्य माध्यमातून सादरीकरण करत प्रबोधन करण्यात आले.