शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठाकडून परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2021 19:23 IST

एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे.

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाने ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या हिवाळी सत्रातील परीक्षांचे अर्ज भरण्यास दि. १४ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या मुदतीपर्यंत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये अर्ज भरावयाचे आहेत.कला, वाणिज्य, विज्ञान, सर्व पदविका, प्रमाणपत्र, बी. व्होक आणि इतर सर्व पारंपरिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज महाविद्यालय अथवा पदव्युत्तर अधिविभागामध्ये भरण्याची अंतिम मुदत दि. ७ डिसेंबरपर्यंत होती. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे काही विद्यार्थ्यांना या मुदतीमध्ये अर्ज भरता आलेले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने मुदतवाढ दिली आहे.महाविद्यालयांनी विद्यापीठामध्ये परीक्षा अर्जाच्या याद्या दि. १६ डिसेंबरपर्यंत सादर करावयाच्या आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक निवास माने यांनी बुधवारी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरexamपरीक्षाShivaji Universityशिवाजी विद्यापीठ