शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत न्या, केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्र्यांची सूचना 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:03 IST

आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी दिल्लीत झाली बैठक

कोल्हापूर : कोल्हापूरविमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी सध्याची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत न्या, अशी स्पष्ट सूचना केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बुधवारी अधिकाऱ्यांना दिली.कोल्हापूर विमानतळाच्या विकासाबाबत नवी दिल्लीत बैठक झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, विमानतळ प्राधिकरणाचे संयुक्त महासंचालक सूरज मल, सदस्य एम. सुरेश, कार्यकारी संचालक सुजय डे, ए. एस. महेशा, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर विमानतळाचे संचालक अनिल शिंदे उपस्थित होते. कोल्हापूर विमानतळाला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद आहे. त्यामुळे कोल्हापुरातून मुंबई आणि दिल्लीसाठी नियमित व सोयीस्कर वेळेत विमानसेवा सुरू व्हावी, अशी मागणी खासदार महाडिक यांनी केली. कोल्हापुरातून दिल्लीसाठी थेट विमानसेवा सुरू करता येईल, त्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या पायाभूत सुविधा अधिक विकसित कराव्यात, विमानतळावर आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करावे, याकडे खासदार महाडिक यांनी लक्ष वेधले. त्याला विमानतळ प्राधिकरणाने अनुकूलता दर्शवून, लवकरच त्याबद्दलची चाचणी घेतली जाईल, असे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कोल्हापूर विमानतळाला श्रेणी पाचमधून, श्रेणी सहामध्ये वर्ग करावे, ज्यामुळे मोठया क्षमतेची विमाने कोल्हापुरात येऊ शकतील. तसेच, जगाच्या नकाशावर कोल्हापूर विमानतळाचे नाव येण्यासाठी अत्याधुनिक सामग्री आणि पायाभूत सुविधा विमानतळावर उपलब्ध व्हावी, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली.

धावपट्टी २३०० मीटर होणे आवश्यकसध्या कोल्हापूर विमानतळावर १९३० मीटरची धावपट्टी आहे. पहिल्या टप्प्यात ही धावपट्टी २३०० मीटर होणे गरजेचे आहे. पण, त्यासाठी विमानतळ परिसरातील एका रस्त्याला पर्यायी रस्ता देवून, आवश्यक कार्यवाही सुरू असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.