शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कुळवाडी, कुलवाडी क्षेत्र पाहणीला मुदतवाढ द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 10:49 IST

कुळवाडी, कुलवाडी समाजाच्या क्षेत्रपाहणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि अन्य कार्यकर्त्यांनी याबाबत नेमण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देकुळवाडी, कुलवाडी क्षेत्र पाहणीला मुदतवाढ द्याउपसमितीच्या सदस्यांकडे वसंतराव मुळीक यांची मागणी

कोल्हापूर : कुळवाडी, कुलवाडी समाजाच्या क्षेत्रपाहणीसाठी दोन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी मागणी मराठा महासंघाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक आणि अन्य कार्यकर्त्यांनी याबाबत नेमण्यात आलेल्या उपसमितीचे सदस्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या कुलवाडी जातीचे सर्वेक्षण व क्षेत्रपाहणी करण्याकरिता एक उपसमिती बुधवारी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली आहे. डॉ. दत्तात्रय बाळ सराफ, रोहिदास जाधव, डॉ. सर्जेराव निमसे, संशोधन अधिकारी के. एस. आढे, एन. व्ही. जोशी यांचा या समितीमध्ये समावेश आहे.वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, प्रताप वरूटे-नाईक, डॉ. देविका पाटील, अमित आडसुळे यांनी या सदस्यांची दुपारी भेट घेऊन अपुऱ्या कालावधीत पूर्वसूचना मिळाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील बाराही तालुक्यांतील या समाजाच्या कुटुंबांना माहिती देण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन दिले.ज्या भागामध्ये कुळवाडी, कुलवाडी जातीचे लोक वास्तव्यास आहेत, अशा ठिकाणी ही समिती जाणार असून, ती आज गुरुवारी कोकणात जाणार आहे. दरम्यान, मधुकर पोटे आर्दाळ, म्हंकाळी चौगुले मेंढोली, संभाजी मनगुतकर आजरा यांनी या समाजातील लोकांनाही इतर मागासचे दाखले देण्यासाठी ग्राह्य धरावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे; त्यामुळे समितीचे सदस्य गुरुवारी आजऱ्यात संबंधितांशी चर्चा करणार आहेत.डॉ. दत्तात्रय बाळ सराफ म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात ज्या पद्धतीने महाराष्ट्रातून ४५ हजार फॉर्म भरून घेतले होते. याच पद्धतीने आता कुळवाडी समाजातील लोकांकडून फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत. हा प्राथमिक दौरा असून, यावेळी चर्चा केली जाईल, निवेदने घेतली जातील. यानंतर संबंधितांकडून राज्यभरातून किमान ५00 फॉर्म भरून घेतले जातील आणि याबाबतचा अहवाल आयोगाकडे सादर केला जाईल.

 

 

टॅग्स :marathaमराठाkolhapurकोल्हापूर