शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, तरुणाचा डोळा निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:44 IST

गेम खेळताना मोबाईल गरम होउन स्फोट झाला, आणि मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने डोळाच निकामी झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली.

ठळक मुद्देमोबाईलचा स्फोट होऊन उंदरवाडी येथील तरुणाचा डोळा निकामीपालकांनी घेतला धसका

सरवडे/कोल्हापूर :  गेम खेळताना मोबाईल गरम होउन स्फोट झाला, आणि मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने डोळाच निकामी झाल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यात घडली.कागल तालुक्यातील उंदरवाडी येथील अमोल दत्तात्रय पाटील ( वय १६) हा दोन मोबाईलवर गेम खेळत बसला होता. बराच वेळ गेम खेळत बसल्याने मोबाईल गरम झाला आणि त्याचा स्फोट झाला. या मोबाईलमधील पार्टचा तुकडा डाव्या डोळ्यात घुसल्याने अमोलचा डोळाच निकामी झाला आहे.या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून मुलांच्या हातून मोबाईल काढून घेणे आणि त्याच्या वापरास मज्जाव करण्याचा आग्रह पालक धरताना दिसून येत आहेत.अमोलने सरवडे येथील खोराटे विद्यालयातून १० वीची परीक्षा दिली आहे. त्याचा लवकरच निकाल लागणार आहे. हुशार अमोलला पालकांनी जादा क्लाससाठी के.पी.पाटील शैक्षणिक संकुलात दाखल केले आहे. बुधवारी घरातील सर्वजण भैरीचे पठार येथे शेतीकामासाठी गेले होते. सकाळी १० च्या सुमारास अमोलने जनावरांना वैरण घातली आणि तेथेच मोबाईलवर गेम खेळत बसला.

थोड्या वेळाने मोबाईल गरम झाला आणि स्फोट झाला, तेव्हा त्या मोबाईल मधील एक लांब तुकडा त्याच्या डाव्या डोळ्यात घुसला. वेदना होत झाल्याने शेजारील लोकांनी वडिलांना कळवले. वडील शेतातून आल्यावर अमोलला कोल्हापूरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथील नेत्ररोग तज्ञांनी तत्काळ शस्रक्रिया करुन तो तुकडा काढला, मात्र डोळा निकामी झाल्याचे सांगितले.अमोलला घरी आणले आहे. शांत व हुशार अमोलचा मोबाईलमुळे एका डोळ्याने दिसणे बंद झाले. यापुढे अभ्यासामध्ये अडथळा जाणवणार आहे, याचे वडिलांना मोठे दु:ख झाले आहे. दहावीच्या परिक्षेत उज्ज्वल यश मिळणारच या अपेक्षेने त्याने पुढील शिक्षणासाठी ५५ हजार रुपये फी भरुन खासगी क्लास सुरु ठेवला आहे. पण हुशार अमोलचा डोळा मोबाईलमुळे निकामी झाल्याने घरच्यांनाही मानसिक धक्का बसला आहे. संबंधित मोबाईल कंपनी विरोधात न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचे अमोलचे वडील दत्तात्रय पाटील यांनी सांगितले.पालकांनी घेतला धसकामोबाईलचा स्फोट होऊन अगदी जवळच ही दुर्घटना घडल्याने याचे पडसाद तत्काळ जिल्हाभर उमटले आहेत. अनेक पालकांनी मुलांच्या कडून मोबाईल काढून घेतले, तर अनेकांनी पै-पाहुणे, मित्र परिवार यांना फोनवरुन या घटनेची कल्पना दिली, व सावधानतेचा इशारा दिला.

मोबाईलचा स्फोट झाल्याने त्यातील लोखंडी धातूचा तुकडा डाव्या डोळ्याखालच्या पापनीतून घुसून मुख्य नसापर्यत पोहोचला. त्यामुळे ती नस तुटून डोळ्याला इजा झाली. डोळा संपूर्णपणे निकामी झाला असल्याने त्याला दिसणे बंद झाले आहे. फक्त शस्त्रक्रियामुळे त्याला दिसत नाही हे ओळखून येणार नाही.डॉ. सुजाता नवरे,डॉ. आदिती वाटवे,कोल्हापूर

टॅग्स :Mobileमोबाइलkolhapurकोल्हापूर