शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत घरगुती गॅस गळतीमुळे स्फोट, वृद्ध दाम्पत्य गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 15:22 IST

Kolhapur News: सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथील घरामधील गिझरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

इचलकरंजी -  सांगली नाका परिसरातील वृंदावन कॉलनी येथील घरामधील गिझरला जोडलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मधून गॅस गळती झाल्याने स्फोट झाला. या घटनेत वृद्ध दांपत्य गंभीर जखमी झाले असून त्यांना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ही घटना गुरुवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. या स्फोटाने संपूर्ण घराला भेगा पडल्या असून आजूबाजूच्या व समोरील घरांच्या काचा आणि टाईल्स देखील निखळून पडल्या. घरातील प्रापंचिक साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

अण्णासाहेब अंदरघिस्के आणि त्यांच्या पत्नी मनीषा अशी गंभीर जखमींची नावे आहेत. दरम्यान, याच घरात वरील मजल्यावर झोपलेला त्यांचा मुलगा आणि त्याचे कुटुंब सुखरूप आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी वृंदावन कॉलनी येथे अंदरघिस्के कुटुंबीय राहण्यास आहे ,घरातील खालच्या मजल्यावर आण्णासाहेब आणि त्यांच्या पत्नी मनीषा राहतात तर दुसऱ्या मजल्यावर त्यांचा मुलगा निशांत आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहतात, पहाटे 4:45 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे झालेल्या या भीषण घरगुती गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण परिसर हदरून गेला कोणाला काहीच कळाले नाही, घटनेमध्ये अण्णासाहेब आणि त्यांची पत्नी जखमी झाली त्यांना सुरुवातीला येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नेले. तेथून प्राथमिक उपचार करून दोघांनाही सांगली सिव्हिल रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाणे, महसूल विभागाचे तलाठी, पुरवठा विभागाचे अधिकारी, आणि संबंधित गॅस कंपनीचे प्रतिनिधी यांनी येऊन प्रत्यक्ष जागेवर पाहणी करत पंचनामा केला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की घरा पाठीमागे असलेल्या पत्राचा शेड त्याचे पत्रे भिंती पूर्ण ढासळल्या घराशेजारी रिकाम्या जागेवर असणारी पत्रे पडले तर संपूर्ण घराला भेगा पडल्या आहेत. या घटनेने परिसरातील नागरिकांना चांगलाच धक्का बसला आहे. परिसरातील नागरिकांच्या सहाय्याने दिवसभर नुकसान ग्रस्त साहित्य हलवण्याचे काम सुरू होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji: Gas Leak Explosion Injures Elderly Couple Severely

Web Summary : A gas leak triggered an explosion in Ichalkaranji, severely injuring an elderly couple. Their home was significantly damaged, impacting nearby houses. The couple is receiving treatment in Sangli. Authorities are investigating.
टॅग्स :Blastस्फोटkolhapurकोल्हापूर