शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

‘एज्युकेशनल समर कॅम्प’ची उत्साहात सांगता : स्टोरी टेलिंग, हँडरायटिंग, रोबोटेकबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 00:58 IST

सुटी म्हटलं की, मुलांपेक्षा पालकांना प्रश्न पडतो की, या सुटीत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे आणि मग शोधाशोध सुरू होते, ती वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांची; पण मुलांची आवड आणि त्याचा शालेय जीवनात उपयोग झाला पाहिजे, असा पालकांचा हट्ट असतो, म्हणूनच ‘लोकमत’च्या बाल विकास मंचने ‘एज्युकेशनल समर कॅम्प’चे आयोजन

ठळक मुद्देलोकमत बाल विकास मंचतर्फे आयोजन

कोल्हापूर : सुटी म्हटलं की, मुलांपेक्षा पालकांना प्रश्न पडतो की, या सुटीत मुलांना कुठे गुंतवून ठेवायचे आणि मग शोधाशोध सुरू होते, ती वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांची; पण मुलांची आवड आणि त्याचा शालेय जीवनात उपयोग झाला पाहिजे, असा पालकांचा हट्ट असतो, म्हणूनच ‘लोकमत’च्या बाल विकास मंचने ‘एज्युकेशनल समर कॅम्प’चे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये या कॅम्पचा शुक्रवारी समारोप झाला.

येथील स्टर्लिंग टॉवरमधील डायस अकॅडमीमध्ये शनिवार (दि. २५) पासून या कॅम्पची सुरुवात झाली. त्यामध्ये मुलांना रोज वेगळ्या गोष्टी शिकविण्यात येत होत्या. त्यात स्टोरी टेलिंग, हॅन्डरायटिंग, रोबोटेक, मॅथेमॅटिकल ट्रिक्स, स्टेज डेरिंग, विज्ञानातील गमतीजमती आणि विनागॅस पदार्थ बनविणे शिकविण्यात आले. स्टोरी टेलिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळाला. प्रशिक्षिका अनघा मेहतर यांनी मुलांना वेगवेगळे शब्द देऊन स्वत: कशा गोष्टी तयार करायच्या हे शिकविले. सोनाली देसाई यांनी वळणदार अक्षर कसे काढावे.

गणित विषय सोप्या सोप्या ट्रिक्स वापरून सोपा कसा करायचा, हे शिकविले. मुलांना नेहमीच उत्सुकता असलेले रोबोट स्वत: बनवून ते चालविताना त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याचे प्रशिक्षण रोबोस्ट्रॉमस एज्युकेशन सेंटर प्रायव्हेट लिमिटेडच्या सुधीर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अतिशय सोप्या पद्धतीत दिले. सध्या मुलांना विविध क्षेत्रामध्ये स्टेज डेरिंग खूप महत्त्वाचे असते, ते कसे आत्मसात करायचे याबाबत सुरेश विटेकर यांनी मार्गदर्शन केले.

विज्ञान हा विषय पुस्तक वाचून शिकण्यापेक्षा प्रात्यक्षिक करून शिकला, तर तो कायमस्वरूपी कसा लक्षात राहतो, हे डायस अकॅडमीच्या दिशा पाटील यांनी प्रात्यक्षिकांसह सांगितले. आई घरी नसताना भूक लागली तर गॅस न वापरता छान खाऊ कसा बनवायचा हे मुलांना रंजक पद्धतीने उज्ज्वला कुकिंग क्लासच्या उज्ज्वला भोसले यांनी शिकविले. शेवटच्या दिवशी सर्व मुलांचे पालकांसहित स्नेहसंमेलन घेण्यात आले. त्यामध्ये दिशा पाटील यांनी सर्व पालकांना मुलांच्या भविष्यासाठी काय केले पाहिजे, याबाबत मार्गदर्शन केले.

‘बाल विकास मंच’साठी लवकरच नोंदणीजून २०१९ ‘बाल विकास मंच’ची सभासद नोंदणी सुरूहोणार आहे. यावर्षी मिळणाऱ्या हमखास भेटवस्तूंचे अनावरण या एज्युकेशनल समर कॅम्पच्या समारोपावेळी प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. फक्त२00 रुपयांमध्ये विद्यार्थ्यांना सेलोची वॉटर बॉटल आणि टिफिन बॉक्स देण्यात येणार आहे; शिवाय लाखोंचा लकी ड्रॉ आणि वर्षभर कार्यक्रमांचा खजिना मिळणार आहे.

माझी मुलगी गेले तीन वर्षे बाल विकास मंचची सभासद आहे. या कॅम्पमध्ये तिच्यामध्ये खूपच बदल झाला आहे. तिचा मोबाईल, टी. व्ही. पाहणे कमी झाले आहे. तिचे कुतूहल वाढले. या कॅम्पसाठी ‘लोकमत’चे आभार मानते.- प्राजक्ता ढेरे, पालक

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर