शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

ढगांच्या लपंडावात चंद्रग्रहणाचा अनुभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 15:28 IST

पावसाळी वातावरण अन् वाऱ्यामुळे सुरू असलेला ढगांच्या लपाछपीत अर्धवट चंद्रबिंबाचा नाटकीय खेळ आकाशाच्या रंगमंचावर रंगला होता.

ठळक मुद्देढगांच्या लपंडावात चंद्रग्रहणाचा अनुभववटपौर्णिमेच्या रात्री पाहिले छायाकल्प चंद्रग्रहण 

कोल्हापूर : पावसाळी वातावरण अन् वाऱ्यामुळे सुरू असलेला ढगांच्या लपाछपीत अर्धवट चंद्रबिंबाचा नाटकीय खेळ आकाशाच्या रंगमंचावर रंगला होता.

चंद्रग्रहण हे नेहमी पोर्णिमेला होत असल्याने चंद्रोदय सायंकाळी सहा वाजून ५४ मिनिटांनी पूर्ण प्रकाश मान बिंब उगवले होते हे ग्रहण छायाकल्प असल्याने चंद्रबिंब नेहमीपेक्षा कमी प्रकाशित होते. ग्रहणाची सुरुवात रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी झाली. त्यानंतर ती सहा जूनला पहाटे ०२:३४ ला संपले.

या ग्रहणाचा कालावधी तीन तास १५ मिनिटे आणि ४७ सेकंद असा होता. दिवसभर वातावरण ढगाळ होते पाऊस पडला नसला तरी आभाळात नभांचे पुंजके विखुरलेले होते त्यामुळे खगोल प्रेमींना मधे चंद्रबिंब ढगाआड गेल्यानंतर वाट पहावी लागत होती.खग्रास व खंडग्रास आणि छायाकल्प चंद्रग्रहणावेळी चंद्र आणि पृथ्वी यामध्ये पृथ्वीची सावली आल्यामुळे ग्रहण होते. रात्री झालेल्या ग्रहणावेळी चंद्र हा पृथ्वीचा विरळ सावलीतून गेल्यामुळे ते छायाकल्प होते. पौर्णिमेचा चंद्र पूर्ण प्रकाशमान असतो, मात्र शुक्रवारी वटपौर्णिमेदिवशी मध्यरात्रीनंतर छायाकल्प चंद्रग्रहण होते. त्यामुळे चंद्राचा तेजस्वीपणा कमी झाला होता. तो किंचित तांबूसही होता.

वटपौर्णिमेच्या रात्री पाहिले छायाकल्प चंद्रग्रहण 

वटपौर्णिमेच्या रात्री वर्षातील दुसरे छायाकल्प चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमी नागरिकांनी लुटला. कोल्हापुरातून शुक्रवारी रात्री ११ वाजून १५ मिनिटांनी या ग्रहणाची सुरवात झाली. छायाकल्प ग्रहणाचा मध्य रात्री १२ वाजुन ५४ मिनिटांनी होता आणि चंद्राचा ५७ टक्के भाग ह्या वेळेला पृथ्वीच्या उपछायेतून छायाकल्प गेल्याने तो तांबूस रंगाचा दिसत होता.

दि. ६ जूनच्या पहाटे २ वाजून ३४ मिनिटांनी चंद्राची ग्रहण अवस्था संपली. या छायाकल्प चंद्रग्रहणाचा कालावधी हा ३ तास १८ मिनिटे इतका होता. या वेळी पौर्णिमेच्या चंद्राची ग्रहकालावधीत तेजस्विता उणे ०.९७ ते उणे ०.४१ असल्यामुळे ते पाहताना डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी लागत नसल्यामुळे साध्या डोळ्यांनी आणि दुर्बिणीच्या साह्याने चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद शहरातील नागरिकांना लुटला.

हे चंद्रग्रहण संपुर्ण भारतासह, आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, दक्षिण-पूर्व दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक, हिंद महासागर, अंटार्क्टिका या भागामधून दिसले. खगोलप्रेमी नागरिक आणि विद्यार्थ्यांना विज्ञानयुगामध्ये मात्र अंधश्रेद्धेला मागे टाकत हे चंद्रग्रहण पाहिले.  यापुढील चंद्रग्रहणे दि. ५ जुलै, ३० नोव्हेंबर आणि १४ डिसेंबर रोजी होतील परंतू ते भारतातून दिसणार नाहीत.- डॉ. राजीव व्हटकर,समन्वयक, अवकाश संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठकोल्हापूर 

यापुढील चंद्रग्रहण पाच जुलै रोजी होणार आहे, पण ते दिवसा होत असल्याने भारतात दिसणार नाही. अमेरिकेत दिसेल. २१  जून रोजी ज्येष्ठ अमावस्येला कंकणाकृती सूर्यग्रहणाचा योग आहे यावेळी कंकणही फार लहान असणार आहे. चंद्र सूर्यासमोर आल्याने  सूर्याचा ९९ टक्के भाग व्यापणार आहे. हे ग्रहण भारतात कुरुक्षेत्र जोशीमठ लेह-लडाख पट्ट्यात दिसणार आहे. कंकणाकृतीची वेळ फक्त ३३ सेकंद असणार आहे.- डॉ. राजेंद्र भस्मे,खगोल अभ्यासक, कोल्हापूर 

टॅग्स :Lunar Eclipseचंद्रग्रहणkolhapurकोल्हापूरShivaji Universityशिवाजी विद्यापीठ