शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगेच्या रूकडी बंधाऱ्यावर मृत माशांचा खच, नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2022 17:55 IST

गेल्या काही दिवसापुर्वी कसबा बाबडा, शिये, शिंगणापूर परिसरात देखील अशाच प्रकारे मासे मृत पडले होते.

रुकडी/माणगांव: रूकडी ता. हातकणंगले येथील पंचगंगा नदी काठावर मृत माशांचा खच पडल्यामुळे ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापुर्वी कसबा बाबडा, शिये, शिंगणापूर परिसरात देखील अशाच प्रकारे मासे मृत पडले होते. पंचगंगेतील दुषित पाण्यामुळे हे मासे मृत होत असल्याने ग्रामस्थांमधून नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होवू लागली आहे.शहरातील प्रदूषणाचा फटका नदीला बसत असून मृत माशांचा खच रूकडी येथील बंधारा ठिकाणी येवून साचला आहे. या बंधारा नजीक रूकडी गावास पाणी पुरवठा करणारे जॅकवेल असून या जॅकवेल मध्ये मृत मासे अडकले आहेत. यामुळे जॅकवेल मधून पाणीपुरवठा करणे अडचणीचे झाले असून गावात दुर्गंधी युक्त पाणी येत आहे.दरम्यान, मृत मासे बंधारा येथे येवून अडकल्याची बातमी गावात कळताच नागरिकांनी मासे नेण्यास नदीकाठी गर्दी केली. काही हुल्लडबाज युवकांनी बॅटरीच्या साहाय्याने नदीपाञात उतरून मासे पोते भरून नेले असून विक्रेते ही राञभर नदीतील मासे गोळा करत होते.नदीपरिसरात दुर्गंधी पसरली असून नदीतील पाणी पिण्यासाठी कसे वापरायचे असा संतप्त सवाल नदीकाठचे नागरिक करत आहेत. नदी पात्रात दुषित पाणी सोडणाऱ्या संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे.

वळीवडे व सुर्वे बंधाऱ्याजवळही माशांचा खचवळीवडे येथील स्वामी शांतीप्रकाश घाटाच्या पुर्वे व पश्चिमे कडुन मुडशिंगी, वळिवडे व गांधीनगरचे  हजारे लिटर सांडपाणी पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये मिसळत असल्याने नदीतील लाखो मासे म्रुत होऊन वळीवडे  व येथील सुर्वे बंधार्याजवळ मृत माशांचा खच १/२ किलोमीटर लांब पात्र होउन नदीचे पाणी दिसेनासे झाले.

पर्यावरण प्रेमींनी प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी निलेश मरभळ यांना या दोन्ही ठिकाणी नेऊन दुषीत पाण्याचे, मृत माशांचे नुमने पंचनामाकरुन ताब्यात घेण्यास भाग पाडले. येवढ्या प्रमाणात मासे मरण्याची ही पहालीच घटना असल्याने लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने व प्रदुषण नियंत्रणातील वरीष्ठ अधिकाऱ्यां ही घटना गांभिर्याने घेणे गरजेचे आहे. अॅड. बाबा इंदुलकर, दिलीप देसाई व सागर तामगावे ह्यानी हा प्रकार उघडकीस आणला.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर