शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ईडी’च्या छाप्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:13 IST

कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या संशयातून ‘ईडी’च्या पथकाने कोल्हापूरसह इचलकरंजी व जयसिंगपूर येथे छापे टाकल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरपाठोपाठ सांगली, सातारा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, नामवंत डॉक्टरांची नावे रडारवर आहेत.

ठळक मुद्दे‘ईडी’च्या छाप्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळकोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील व्यापारी, डॉक्टर, बिल्डरांनी घेतली धास्ती

कोल्हापूर : कोट्यवधी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता असल्याच्या संशयातून ‘ईडी’च्या पथकाने कोल्हापूरसह इचलकरंजी व जयसिंगपूर येथे छापे टाकल्याने पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कोल्हापूरपाठोपाठ सांगली, सातारा येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, नामवंत डॉक्टरांची नावे रडारवर आहेत.

गेल्या दोन दिवसांपासून हे पथक जिल्ह्यात तळ ठोकून असून, त्याने संबंधितांचे घर, कार्यालय, सराफ दुकान, हॉस्पिटल, फार्म हाऊसची चौकशी सुरू ठेवली आहे. छापासत्रामुळे व्यापारी, डॉक्टर आणि बांधकाम व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. कोल्हापुरातील आणखी दोन बांधकाम व्यावसायिक रडारवर आहेत.

कोल्हापुरातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, इचलकरंजीतील माजी नगरसेवक, जयसिंगपूरमधील डॉक्टर व सराफ या चौघांची पथकाकडून कसून चौकशी सुरू आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा येथील काहीजण रडारवर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक बडे व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि नामवंत डॉक्टरांची यादी ‘ईडी’कडे आहे. शासनाचा कोणत्याही प्रकारचा टॅक्स न भरता त्यांनी आपले उद्योग सुरू केले आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता त्यांच्याकडे असल्याच्या तक्रारी ‘ईडी’कडे केल्या होत्या.

काही सामाजिक कार्यकर्त्यांनी निनावी पत्राद्वारे या तक्रारी केल्या आहेत. या सर्वांवर कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याचे सगळेच भेदरून गेले आहेत. पथक आपल्यापर्यंत पोहोचू नये यासाठी, काहीजण भीतीने दुकाने बंद करून, घराला कुलूप लावून कुटुंबासह पर्यटनवारीला गेल्याची चर्चा आहे.मोबाईल बंद

‘ईडी’चे पथक कोल्हापुरात आल्याचे समजल्यावर बड्या उद्योजकांनी आपल्या सहकारी मित्रांना फोन करून याची कल्पना दिली. त्यानंतर काहींनी आपले मोबाईल बंद करून ठेवले, तर काहीजण शेजारच्या राज्यात पळाल्याने त्यांचे मोबाईल नॉट रिचेबल, संपर्कक्षेत्राच्या बाहेर असल्याची चर्चा आहे.

नावाची जोरदार चर्चा‘ईडी’चा छापा पडलेला माजी नगरसेवक, डॉक्टर, बांधकाम व्यावसायिक, सराफ व्यापारी कोण, याबाबत लोक तर्कवितर्क लावीत होते. व्यापारी एकमेकांना फोनवरून विचारणा करीत होते. पथक कुठे आहे, याबाबतही काहीजण माहिती घेत होते; परंतु ज्यांची चौकशी झाली तेसुद्धा आपणाला काहीच माहिती नसल्याचे दाखवीत होते. पथकाने त्यांना सुरुवातीलाच गोपनीयता पाळण्याच्या सूचना दिल्याचे समजते. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर