शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘वेब पोर्टल’द्वारे परीक्षाविषयक माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:58 IST

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून आता वेब पोर्टलद्वारे परीक्षाविषयक सूचना आणि माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य संकेतस्थळाशी हे नवे पोर्टल संलग्नित असणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ते कार्यान्वित होणार आहे.परीक्षाविषयक कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने सिक्युर्ड रिमोट पेपर ...

संतोष मिठारी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून आता वेब पोर्टलद्वारे परीक्षाविषयक सूचना आणि माहिती दिली जाणार आहे. विद्यापीठाच्या मुख्य संकेतस्थळाशी हे नवे पोर्टल संलग्नित असणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ते कार्यान्वित होणार आहे.परीक्षाविषयक कामकाजात जास्तीत जास्त प्रमाणात माहिती व तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या उद्देशाने सिक्युर्ड रिमोट पेपर डिलिव्हरी (एसआरपीडी, गोपनीय व नियंत्रित पद्धतीने प्रश्नपत्रिका वितरण), आॅनलाईन निकाल, डिजिटल प्रमाणपत्राची सुरुवात परीक्षा मंडळाने केली आहे. याअंतर्गत आणखी एक नवे पाऊल म्हणून आता या मंडळाचे वेब पोर्टल सुरू होणार आहे. परीक्षाविषयक सर्वप्रकारच्या सूचना, वेळापत्रके, अर्ज आदींचे आदान-प्रदान करण्यासाठी या पोर्टलचा वापर होईल. परीक्षेबाबतची माहिती संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे आदी कामे देखील याद्वारे होतील. पोर्टलमध्ये आधुनिक पद्धतीने माहिती प्रकाशित होणार आहे. विद्यार्थी, महाविद्यालये, परीक्षा, दूरशिक्षण विभाग आणि पदवी, पदव्युत्तर, एम. फील., पीएच.डी. असे वर्गीकरण असणार आहे. त्यामुळे यातून हवी ती माहिती शोधणे सहज शक्य होईल. यामध्ये परीक्षांचे वेळापत्रक, अंतिम दिनांक आदी माहिती ठळक स्वरुपात दिसणार आहे. ई-मेल, एसएमएसद्वारे परीक्षेचे वेळापत्रक, अर्जाची मुदत यांची माहिती पाठविता येणार आहे.डिसेंबर अखेरपर्यंत कार्यान्वितसध्या परीक्षाविषयक सूचना प्रकाशित करण्यासाठी (ङ्मल्ल’्रल्ली.२ँ्र५ं्न्र४ल्ल्र५ी१२्र३८.्रल्ल) या नावाने एक वेबपेज कार्यरत आहे. त्यातून हवी ती माहिती शोधणे थोडे अवघड ठरत आहे. त्यामुळे परीक्षाविषयक कामकाजातील गोपनीयता, काटेकोर कालबद्ध अंमबजावणी या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन या नव्या वेबपोर्टलचा वापर केला जाणार असल्याचे संचालक महेश काकडे यांनी सांगितले. ते म्हणाले, परीक्षेबाबतची सर्व माहिती, सूचना विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचारी या घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे. कुलगुरुंच्या मार्गदर्शनाखाली या वेब पोर्टल निर्मितीचे काम सुरू आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ते कार्यान्वित केले जाईल.

टॅग्स :educationशैक्षणिक