शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दहावीची परीक्षा मंगळवारपासून, कोल्हापूर विभागात एक लाख ४१ हजार परीक्षार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 19:16 IST

दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. ही परीक्षा दि. २३ मार्चपर्यंत चालणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख ४१ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.

ठळक मुद्दे दहावीची परीक्षा मंगळवारपासून, कोल्हापूर विभागात एक लाख ४१ हजार परीक्षार्थीमोबाईल, कॅमेरा, स्मार्टवॉचला बंदी

कोल्हापूर : दहावीच्या परीक्षेचा प्रारंभ मंगळवारी (दि. ३ मार्च) सकाळी ११ वाजता मराठी विषयाच्या पेपरने होणार आहे. ही परीक्षा दि. २३ मार्चपर्यंत चालणार आहे. या वर्षी कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील एकूण एक लाख ४१ हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी परीक्षा देणार आहेत.या परीक्षार्थींची कलचाचणी जानेवारीमध्ये झाली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील या परीक्षेत गणित आणि इंग्रजी विषयाची बहुसंच प्रश्नपत्रिका असणार नाही. कोल्हापूर विभागातील एकूण ३५४ केंद्रांवर परीक्षा होणार असून, त्यावर २१ भरारी पथकांची नजर राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी सात भरारी पथके असणार आहेत.

विभागातील सर्व विद्यार्थ्यांना त्यांची प्रवेशपत्रे आॅनलाईन पद्धतीने राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उपलब्ध करून दिली आहेत. उत्तरपत्रिका आणि आवश्यक स्टेशनरी साहित्य परीक्षा केंद्रांवर पोहोचविण्यात आले. परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे.

परीक्षेच्या कालावधीत परीक्षार्थी, पर्यवेक्षक आणि केंद्र संचालकांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांना कॅमेरा असलेले स्मार्टवॉच (घड्याळ), पेन वापरण्यास बंदी असल्याचे शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव सुरेश आवारी यांनी शुक्रवारी सांगितले.परीक्षार्थींसाठी ‘हेल्पलाईन’दहावीच्या परीक्षार्थींसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागाकडून २४ तास हेल्पलाईन सेवा सुरू केली आहे. परीक्षेत विद्यार्थी, पालकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मंडळातील अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांची हेल्पलाईनसाठी नियुक्ती केली आहे.

यामध्ये विभागीय सचिव एस. एम. आवारी (९४२३४६२४१४), सहसचिव डी. बी. कुलाळ (७५८८६३६३०१), साहाय्यक सचिव एस. एस. सावंत (८००७५९७०७१), वरिष्ठ अधीक्षक पी. एच. धराडे (९८५००२०७९०), एस. एल. हावळ (९८९०७७२२२९), एस. एस. कारंडे (९८६००१४३५६), आदींचा समावेश आहे. हेल्पलाईन दि. २३ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. 

 

टॅग्स :examपरीक्षाkolhapurकोल्हापूर