शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 21:46 IST

महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे अंतिम सत्रातील श्रेणी सुधारण्यासाठी डिसेंबरनंतर घेणार परीक्षा : उदय सामंतयूजीसीला पाठविणार पत्र : विरोधकांनी राजकारणापेक्षा विद्यार्थिहिताचा विचार करावा

कोल्हापूर : आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दोन वेळा दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात अंतिम सत्राच्या परीक्षा सध्या घेणे शक्य नाही. त्यामुळे सरासरी पद्धतीनेप्रमाणे गुण देऊन या विद्यार्थ्यांना पदवी द्यावयाची. ज्या विद्यार्थ्यांना गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा द्यावयाची आहे, त्यांची परीक्षा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर डिसेंबरनंतर घेतली जाईल. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला परीक्षाच घ्यावयाच्या नाहीत, असा विरोधक करीत असलेला आरोप चुकीचा असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्रीउदय सामंत यांनी रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिल्ली, पंजाब, राजस्थान, आदी राज्यांसह आयआयटीसारख्या संस्थेने परीक्षा रद्द केली आहे. त्यामुळे यूजीसीने सद्य:स्थिती समजून घ्यावी. राज्यातील सर्व कुलगुरूंशी चर्चा करून, त्यांच्या शिफारशी घेऊन राज्य सरकारने अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत निर्णय घेतला आहे.

अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना आता पदवी देऊन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर गुण, श्रेणी सुधारण्यासाठी परीक्षा घेण्याचा निर्णय यूजीसीने देशभरासाठी घ्यावा. त्याबाबचे पत्र दोन दिवसांत यूजीसीला पाठविणार आहे. त्यामुळे सध्या परीक्षेच्या मुद्द्यावरून राजकारण करण्यापेक्षा विरोधकांनी विद्यार्थिहिताचा विचार करावा, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.मंत्री सामंत म्हणाले

  • या वर्षीचे शुल्क परत मिळेल अथवा पुढील वर्षासाठी ते आकारावे, अशा पर्यायांचा विचार सरकार करीत आहे. त्यामुळे पालकांनी निर्धास्त राहावे.
  • एटीकेटी विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन कॅरी फॉरवर्ड केले जाईल.
  • जे कॅरी फॉरवर्ड होणार नाहीत त्यांना ग्रेस गुण दिले जातील. तरीही जे उत्तीर्ण होणार नाहीत, त्यांची कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर परीक्षा घेतली जाईल.
  • ग्रंथालय सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
  • आगामी अधिवेशनात ग्रंथालयाबाबत नवे धोरण आणले जाणार आहे.

६० जीआर काढून मागे घेतले नाहीत.६० जीआर काढून ते मागे घेतले नाहीत. ट्विट करून ते डिलिट केलेले नाही. एक जीआर काढून त्यावर ठाम आहे, असे मंत्री सामंत यांनी माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या टीकेला उत्तर दिले.खासदार राऊत यांच्या चिरंजीवाबाबतचा व्हिडीओ एडिट केलेला.खासदार विनायक राऊत यांच्या चिरंजीवाबाबत व्हिडिओ ट्विट करणाऱ्यांबद्दल काय बोलायचे? विरोधकांनी ट्विट केलेला हा व्हिडीओ एडिट केलेला आहे. राऊत यांचा चिरंजीव निर्व्यसनी आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपात तथ्य नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले

टॅग्स :Uday Samantउदय सामंतministerमंत्रीkolhapurकोल्हापूर