शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

ईडब्लूएसचा निर्णय म्हणजे बैल गेला आणि झोपा केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:20 IST

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय ...

विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्य शासनाने मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाच्या (ईडब्लूएस) आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला असला तरी वैद्यकीय विद्याशाखेची प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असल्याने या विद्यार्थ्यांना या निर्णयाचा मात्र बैल गेला आणि झोपा केला असाच अनुभव येत आहे. या कोट्याबाबतचा निर्णय लवकर घ्यावा, अशी पालकांची खूप दिवसांपासून मागणी होती. परंतु मराठा समाजातील नेत्यांमध्ये एसईबीसी की, ईडब्लूएस असे दोन मतप्रवाह तयार झाल्याने राज्य सरकारनेही निर्णय घेण्यास विलंब केला. त्याचा फटका या विद्यार्थ्यांना बसला आहे. आता राज्य सरकारने या आरक्षणाचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे नेते प्रवीणदादा गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.

मुख्यत: राज्यात एमबीबीएसच्या ५,४२८ जागा असून, त्यातील प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली. त्यामध्ये .४,३९६ प्रवेश निश्चित झाले. दुसऱ्या फेरीसाठी शासकीय महाविद्यालयातील ४९२ व खासगीमधील ५४० प्रवेश झाले. या फेरीनंतर आता शासकीयमधील ५५ आणि खासगीतील ३५८ प्रवेशासाठी मॉपअप राऊंड सुरु आहे. गेल्या वर्षी ‘नीट’मध्ये ४९१ गुण मिळालेल्या विद्यार्थ्यास एसईबीसीचे आरक्षण असल्याने शासकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. याउलट यावर्षी मात्र तब्बल ५९१ गुण असूनही विद्यार्थ्यांना खासगी महाविद्यालयांतही प्रवेश मिळणे अवघड बनले. गतवर्षी मराठा समाजातील मुलांना ईडब्लूएसच्या आरक्षणाचा लाभ झाला नव्हता; कारण त्यावेळी एसईबीसीमध्ये मराठा समाज होता. अन्य कोणतेही आरक्षण मिळत असेल तर ईडब्लूएसचा लाभ मिळत नाही. ईडब्लूएसमधून ३१५ जागा आहेत. यंदा एसईबीसी आरक्षणास न्यायालयाने स्थगिती दिल्याने ईडब्लूएसचा लाभ झाला असता; परंतु खासदार संभाजीराजे यांनी ईडब्लूएसचा लाभ घेतल्यास एसईबीसीचे आरक्षण पदरात पडणार नाही, अशी भूमिका घेतल्याने राज्य सरकारचीही कोंडी झाली. त्यामुळे या प्रवर्गातील लाभार्थी आरक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली. या प्रवर्गातून किमान निम्म्या जागांवर मराठा विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला असता तर त्याखालील इतर मुलांना खासगी महाविद्यालयांत तरी प्रवेश मिळू शकला असता; म्हणजे किमान ४२५ विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर प्रश्नचिन्ह लागले आणि ही प्रवेश प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्यावर राज्य सरकारने ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे आता ही प्रक्रिया रिव्हर्स करणे अशक्य बनले आहे. कारण त्यांनी प्रवेश अर्जामध्येच जातप्रवर्ग घातल्याने आता त्यामध्ये दुरुस्ती करण्याची संधी उपलब्ध करून द्यायला हवी. तसे करायला राज्य सरकार कितपत तयार होते, त्यातून काही न्यायालयीन वाद होतील का, ही भीती आहे.

ईडब्लूएसचे आरक्षण लागू करण्याच्या राज्य सरकारच्या भूमिकेचे स्वागत आहे. ते लागू करावे, यासाठी मी पहिल्यापासून आग्रह धरत आलो. सरकारला उशिरा शहाणपण सुचले. आता मराठा समाजातील ज्या तरुणांना प्रवेशासाठी या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे, नोकऱ्यांत संधी मिळणार आहे, ती मिळवून देण्याची जबाबदारी सरकारची आहे. निवडणुकीनंतर सहा महिने तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र सादर करता येत असेल तर तोच न्याय ईडब्लूएसला का लागू होत नाही, असा माझा युक्तिवाद आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी माझे यासंबंधी बोलणे सुरु आहे.

प्रवीणदादा गायकवाड

मराठा क्रांती मोर्चा नेते.