शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांत ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 17:57 IST

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम गुरुवारपासून राबविण्यात येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकावेळी मतदारांच्या शंकांचे निरसन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यातील गावागावांत ‘ईव्हीएम-व्हीव्हीपॅट’ची प्रात्यक्षिके मतदारांच्या शंकांचे निरसन करा :  जिल्हाधिकारी

कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’च्या वापरासंदर्भात जनजागृती होण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात विशेष मोहीम गुरुवारपासून राबविण्यात येणार आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकावेळी मतदारांच्या शंकांचे निरसन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी मंगळवारी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती कार्यक्रमांतर्गत अधिकाºयांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहल भोसले, उपजिल्हाधिकारी अरविंद लाटकर, अविनाश हदगल, निवडणूक तहसीलदार शैलजा पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते.जिल्हाधिकारी सुभेदार म्हणाले, ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राद्वारे होणारी मतदान प्रक्रिया अतिशय पारदर्शी आहे. या यंत्राद्वारे होणाऱ्या मतदान प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्याची मोहीम यशस्वी करावी.

जेणेकरून मतदारांच्या मनात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट संदर्भात असलेली संभ्रमावस्था दूर होईल. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा गावनिहाय कार्यक्रम निश्चित करावा.स्नेहल भोसले यांनी स्वागत केले. शैलजा पाटील यांनी आभार मानले. यावेळी सर्व उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, आदी उपस्थित होते.

प्रात्यक्षिक कार्यक्रमासाठी गावनिहाय आराखडा कराविधानसभा मतदार संघांचा गावनिहाय आराखडा तयार करून, त्यानुसार हा प्रत्यक्षिकाचा कार्यक्रम राबवावा. लोकांच्या विशेषत: मतदारांच्या या प्रक्रियेबाबत असणाऱ्या शंकांचे निरसन करा.

प्रात्यक्षिकामध्ये ईव्हीएमद्वारे प्रत्यक्ष केलेले मतदान आणि व्हीव्हीपॅटद्वारे स्लिपवर येणारे मतदार हे टॅली करून लोकांना दाखवावे. या प्रात्यक्षिकाची सर्व प्रक्रिया आणि कार्यपद्धती जाणून घेऊन, योग्य पद्धतीने डेमोचा कार्यक्रम राबविण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

अधिकाऱ्यांकडून प्रात्यक्षिकेयावेळी तज्ज्ञांमार्फत ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशीनचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी देण्यात आलेल्या मशीनची प्रात्यक्षिके संबंधित अधिकाऱ्यांकडून करून घेण्यात आली. 

 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर