शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकवेळी ‘जवाहर’च टार्गेट

By admin | Updated: December 17, 2015 23:19 IST

ऊसदर आंदोलनातून शेतकऱ्यांचीच कोंडी बिकट अवस्था : ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी, ऊस तुटणारा मवाळ; तर अर्ध्यावरती तोड असलेला शेतकरी हिरमुसला

गणपती कोळी - कुरुंदवाडउसाच्या ‘एफआरपी’च्या पहिल्या उचलीवरून ‘स्वाभिमानी’चे साखर कारखानदारांच्या विरोधातील आंदोलन पेटले आहे. ऊसतोड रोखल्याने ऊस तुटून गेलेला शेतकरी आंदोलनात अग्रभागी आहे. ऊस तुटणारा मवाळ भूमिकेत, तर तोड अर्ध्यावरती असलेला शेतकरी वाळणाऱ्या उसाकडे पाहत हिरमुसला आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘तीन तेरा’ झाली असून, परिस्थिती दयनीय झाली आहे.ऊस पिकाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या खर्चाचा विचार केला, तर किमान २५०० रुपये दर मिळणे अपरिहार्य आहे. मात्र, साखर कारखान्यांनी पहिली उचल १७०० रुपये देत असल्याने शेतकऱ्यांचे सेवा संस्थाचे कर्जही फिटणार नाही. शेतकऱ्यांचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी करीत असल्याने एफआरपीवर ठाम असलेल्या शेट्टी यांनी शासन व साखर संघाच्या बैठकीत तडजोड म्हणून ८० व २० टक्के अशा दोन टप्प्यांत घेण्यावर निर्णय घेतल्याने शेतकरीही राजी झाला होता.मुळातच दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उसाला पाणी मिळत नसल्याने उभे पीक पाण्याअभावी वाळत आहे. अशा परिस्थितीत स्वाभिमानीने ऊस परिषदेतून व तडजोडीतून ऊसतोड बंद आंदोलनाला बगल दिल्याने शेतकरी सुखावला होता. मात्र, या आगतिकतेचा गैरफायदा साखर कारखानदारांनी घेत पहिली उचल २००० रुपयांच्यावर देणे लागत असताना १७०० रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केल्याने ऊस उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे.ऊसतोड थांबविणे हे शेतकऱ्यांनाही मान्य नसले, तरी १७०० रुपये दर घेणेही न परवडणारे आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी झाली आहे. स्वाभिमानीला मात्र ऊसतोड रोखून शेतकऱ्यांच्या साखर कारखानदारांच्या विरोधातील भावना शासनाला कळविण्यासाठी गत्यंतर नसल्याने कारखानदारांना जेरीस आणण्यासाठी ऊसतोड व वाहतूक रोखली गेली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांची अवस्था मात्र तिहेरी झाली आहे. यापूर्वीच ऊस तुटून गेलेला शेतकरी १७०० रुपयांवर सोसायटीचे देणेही भागणार नसल्याने आक्रमक होऊन आंदोलनात सर्वांत पुढे आहे. ऊस तुटून जाणार असलेल्या शेतकऱ्यांचेही हेच दुखणे असले, तरी पाण्याअभावी उभे पीक वाळत असल्याने शेतकरी चिंतेत असून, तोड रोखण्याबाबत मवाळ भूमिकेत आहे. तर सध्या तोड चालू असलेल्या शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. ऊस आंदोलनातून शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.तानाजी घोरपडे -- हुपरीऊस विकास योजनेतून आधुनिक शेतीला प्रोत्साहन देणारा आणि उत्कृष्ट व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरलेला साखर कारखाना अशी ओळख निर्माण करणारा हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर साखर कारखाना हा प्रत्येक आंदोलनावेळी टार्गेट का करण्यात येतो? परिसरातील सात ते आठ कारखान्यांचे गाळप सुरू राहते. मात्र, ‘जवाहर’चेच गाळप का बंद पाडण्यात येते? यामागचे गौडबंगाल काय? असा प्रश्न सर्वसामान्य ऊस उत्पादक शेतकऱ्यातून विचारण्यात येत आहे.जवाहरने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, कामगारांची देणी थकविलेली नाहीत. दराच्या बाबतही सर्वांबरोबर, शेतकऱ्यांसाठी अनेक हितकारक योजना राबविण्यात येतात. आधुनिक आणि यशस्वी शेतीसाठी वेळोवेळी ऊस पिक परिसंवादाद्वारे शेतकऱ्यांना तज्ञांकडून मार्गदर्शन, ५० टक्के अनुदानावर हिरवळीची खते आणि तणनाशकांचा पुरवठा केला जातो. शुद्ध, सुधारित व पायाभूत ऊस बियाणे सभासदांच्या बांधापर्यंत पोहोच करण्यात येतात. ठिबकचा अवलंब करणाऱ्या सभासदांना एकरी दहा हजार अनुदान दिले जाते. द्रवरूप खते, औषधे, गांडूळ बेडची उपलब्धता करून दिली आहे. पाचट वापरासाठी अनुदान दिले जाते. ऊस उत्पादक सभासदांकरिता हृदयावरील बायपास शस्त्रक्रिया, अ‍ॅन्जिओप्लास्टी, कॅन्सर, किडनी ट्रान्स्फरनेशन उपचारांसाठी भरीव वैद्यकीय मदतीचा हात दिला जातो. प्रदूषण नियंत्रणाची आधुनिक योजना राबविल्यामुळे कारखाना परिसरातील गावांना अजिबात उपद्रव होत नाही. कामगारांसाठीही अनेक हितकारक योजना राबविण्यात येत आहेत. दैंनदिन नऊ हजार मेट्रिक टनाची ऊस गळप क्षमता असताना अत्याधुनिक यंत्रणांचा उपयोग करीत दैनंदिन ११ हजारांवर गाळप करण्यात येत आहे. कारखान्याने गेल्या २५ वर्षांमध्ये शेतकरी, सभासद, कर्मचाऱ्यांसाठी अमलात आणलेल्या सोयी-सुविधा, उपाययोजना यांची दखल घेऊन शासनाने देश, राज्य पातळीवरील अनेक पारितोषिके देऊन ‘जवाहर’ला गौरविले आहे. चालू गळीत हंगामास सुरुवात होऊन अवघे ३६ दिवस झाले आहेत. या कालावधीमध्ये तीन लाख ४३ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. ११.८० टक्के सरासरी उतारा मिळाल्याने तीन लाख ९५ हजार साखर पोत्यांचे उत्पादन मिळालेले आहे. ‘जवाहर’ची कारकीर्द अशा पद्धतीची असतानाही प्रत्येक आंदोलनावेळी याच कारखान्याला सर्व प्रथम ‘टार्गेट’ करण्यात येते. ऊसतोड, ऊस वाहतूक थांबविणे, गाळप बंद पाडणे, सर्वांत जास्त दराची अपेक्षा व्यक्त करणे, अशा घटना घडवून आणल्या जातात. ‘जवाहर’ प्रशासनाने आतापर्यंत एकाही शेतकऱ्यांचे देणे ठेवून घेतलेले नाही. दर सर्वांबरोबर तर काहीवेळा अधिक असतो. तरीही ‘जवाहरलाच’ टार्गेट का करण्यात येते?