शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

अखेर कोल्हापुरातून विमानाचे टेकआॅफ, महिला, दिव्यांग मुलांनी घेतला हवाई प्रवासाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 16:04 IST

गेली कित्येक वर्षे चर्चेत असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवारपासून अखेर सुरु झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ‘एअर डेक्कन’चे पहिले विमान दुपारी तीन वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे झेपावले. विशेष म्हणजे या पहिल्या विमानातून कष्टकरी महिला, दिव्यांग मुले, विद्यार्थ्यांनी हवाई प्रवासाचा आनंद घेतला.

ठळक मुद्देउडान योजनेंतर्गत सेवेचा प्रारंभ

कोल्हापूर : गेली कित्येक वर्षे चर्चेत असलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवा मंगळवारपासून अखेर सुरु झाली. केंद्र सरकारच्या उडान योजनेंतर्गत ‘एअर डेक्कन’चे पहिले विमान दुपारी तीन वाजता कोल्हापुरातून मुंबईकडे झेपावले.विशेष म्हणजे या पहिल्या विमानातून कष्टकरी महिला, दिव्यांग मुले, विद्यार्थ्यांनी हवाई प्रवासाचा आनंद घेतला.सहा वर्षांनंतर कोल्हापूरची ही विमानसेवा सुरू झाली.मुंबईतून दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी निघालेल्या एअर डेक्कनच्या विमानातून चेंबर आॅफ कॉमर्स, क्रिडाई कोल्हापूर, हॉटेल मालक संघ, गोशिमा, स्मॅक आदी विविध संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि खासदार धनंजय महाडिक यांनी टेक आॅफ केले. ते दुपारी कोल्हापूरात पोहोचले.

यानंतर लगेचच कोल्हापुरातून दुपारी तीन वाजून पाच मिनिटांनी याच फ्लाईटने मुंबईकडे झेप घेतली. या विमानातून हेल्पर्स आॅफ दि हॅन्डिकॅप्ड, अंधशाळा, बालकल्याण संकुलातील दोन मुले, एकटी संस्था आणि बचत गटातील दोन महिलांचा तसेच एका शेतकरी दाम्पत्याचा समावेश होता. दरम्यान, विमानसेवेच्या प्रारंभानिमित्त हॉटेल मालक संघातर्फे विमानतळ येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी अल्पोपहार देण्यात आला.सर्वसामान्यांना आनंदजिल्ह्यातील पर्यटन, व्यापार, उद्योगवाढीसाठी विमानसेवा सुरू होणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सहा वर्षांनंतर सुरू झालेल्या या विमानसेवेचा प्रारंभ अभिनव पद्धतीने केला गेला. ज्यांनी यापूर्वी कधीच विमान प्रवास अनुभवलेला नाही, विमानही जवळून पाहिलेले नाही, अशा गोरगरीब, सर्वसामान्यांना कोल्हापूर-मुंबई विमानप्रवास घडविण्यात खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेतला. ते म्हणाले, कोल्हापुरातून उड्डाण करणाऱ्या पहिल्या विमानातून सर्वसामान्य महिला, मुलांना प्रवासाचा आनंद मिळणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAirportविमानतळ