शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
2
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
3
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
4
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
5
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
6
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
7
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
8
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
9
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
10
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
11
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
12
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
13
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
14
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
15
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
16
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
17
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
18
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
19
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...

अखेर आपटेनगर रस्त्यावर डांबर

By admin | Updated: February 19, 2015 00:21 IST

पाच वर्षाची प्रतिक्षा : बोंद्रेनगरपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण --लोकमतचा प्रभाव

कळंबा : कळंबा साई मंदिर ते फुलेवाडी रिंगरोड हा उपनगरातील मुख्य रस्ता नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर झाला. कामाची सुरुवात करताना दोन वर्षे रस्त्यावर सुमार दर्जाची खडी पसरण्यात आली. नंतर ठेकेदारानेही काम गुंडाळल्याने पालिका प्रशासनाच्या अनास्थेने काम अर्धवट अवस्थेत होते. नित्याच्या अपघाताने वाहनधारकांना, तर धुळीने परिसरातील रहिवाशांनी गेली पाच वर्षे आवाज उठविला होता. नागरिकांच्या समस्या मांडल्या होत्या. या रस्त्याचे डांबरीकरण बोंद्रेनगरपर्यंत पूर्ण झाले आहे. आसपासच्या गावांना व उपनगरांतील नागरिकांना शहराशी जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता. नुकत्याच केलेल्या सुमार खडीकरणाने पॅचवर्क व अपघात नित्याचे बनले होते. डांबराविना रस्त्याची दुर्दशा झाली हे पाहण्याचे औदार्य ना प्रशासनाने ना लोकप्रतिनिधींनी दाखविले. सुमार रस्त्याचे डांबरीकरण होणार कधी, हा प्रश्न नागरिकांना पाच वर्षे सतावत होता.रस्ता पूर्ण होऊन डांबरीकरण व्हावे यासाठी, रस्त्याच्या सुमार दर्जाविषयी वारंवार ‘लोकमत’मधून बातम्या प्रसिद्ध होत होत्या. अलीकडे प्रभागाच्या समस्या सदरात परखड मत मांडले होते. या बातम्यांची दखल घेऊन नगरसेवक इंद्रजित बोंद्रे यांनी अखेर पालिका निवडणुकीपूर्वी प्रलंबित रस्ता डांबरीकरणाचा प्रश्न मार्गी लावून नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण केल्याने वाहनधारक व नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे. ( वार्ताहर )साई मंदिर ते आपटेनगर मुहूर्त कधी?आपटेनगर ते रिंगरोड अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण झाले तरी साई मंदिर, कळंबा या रस्त्यास डांबर कधी लागणार? रस्त्याच्या एका बाजूचे महेश गायकवाड, तर दुसऱ्या बाजूचे इंद्रजित सलगर प्रतिनिधित्व करत आहेत. दोन प्रभागांच्या मधून जाणाऱ्या हमरस्त्याचे डांबरीकरण करायचे कोणी, हाच कळीचा मुद्दा.लढ्याला यश आपटेनगर ते रिंगरोड रस्ता डांबरीकरण व्हावे यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव बंडोपंत दळवी व सहकारी, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंह देसाई हे परिसरातील मंडळे, नागरिक, महिला बचत गटांसह आंदोलने, रास्ता रोको, निवदने यांसह झगडत होते. त्यांच्या प्रयत्नांस यश आले.