शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: उतावीळ तलाठी अन् गावात लागलं होर्डिंग, नियु्क्तीआधीच झळकले पोस्टर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:22 IST

कोल्हापूर : तलाठी भरतीसाठीच्या निवड यादीत समावेश झाला, तोपर्यंत शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तलाठीपदी नियुक्ती झाल्याचे मोठमोठे डिजिटल ...

कोल्हापूर : तलाठी भरतीसाठीच्या निवड यादीत समावेश झाला, तोपर्यंत शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी तलाठीपदी नियुक्ती झाल्याचे मोठमोठे डिजिटल झळकू लागले आहेत. कागदपत्रांची पडताळणी, तपासणी पूर्ण होऊन प्रत्यक्ष निवडीचे पत्र देण्याला अजून महिन्याभराचा कालावधी लागणार आहे, तोपर्यंत यांची अवस्था म्हणजे उतावीळ नवरा अन् गुडघ्याला बाशिंग अशी झाली आहे.जिल्ह्यात ५५ तलाठी पदांसाठी दिवाळीपूर्वी परीक्षा झाली, त्याच्या निकालातील घोळानंतर कट ऑफ लिस्टप्रमाणे निवड यादी जाहीर करण्यात आली. ही निवड यादी म्हणजेच तलाठीपदी नियुक्ती असाच बहुधा उमेदवारांचा समज झाला आहे. कारण शहरात विशेषत: ग्रामीण भागात उमेदवारांची तलाठीपदी नियुक्ती झाल्याने अभिनंदन केल्याचे मोठमोठे डिजिटल लागले आहेत. नियुक्तीसाठी परीक्षा पास होणे हाच महत्त्वाचा टप्पा असला तरी त्या पुढच्या सर्व प्रक्रियांमधून पार पडणेही तितकेच बंधनकारक असते.निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची प्राथमिक पडताळणी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. ५५ पैकी ४ उमेदवार आले नाही. ५१ उमेदवारांनी कागदपत्रे सादर केली. प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी आपली हजेरी नोंदवली यानंतर पुढील फेरतपासण्या करून प्रत्यक्ष नियुक्तिपत्र द्यायला किमान एक महिन्याचा कालावधी लागेल असे जिल्हा प्रशासनाच्या आस्थापना विभागाने स्पष्ट केले. पण नियुक्तिपत्र मिळण्याआधीच भावी तलाठ्यांच्या अभिनंदनाचे पोस्टर लागले आहेत.

अशी असेल पुढील कार्यवाहीउमेदवारांनी सादर केलेली सर्व कागदपत्रे त्या त्या विभागांना पाठवून ही कागदपत्रे, दाखले प्रमाणपत्र विभागानेच दिले आहेत का याची फेरतपासणी केली जाते. यामध्ये माजी सैनिक, सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन कर्मचारी या वर्गवारीचा समावेश आहे. त्या विभागांकडून कागदपत्रांवर शिक्कामोर्तब झाला तर या वर्गातील उमेदवारांच्या अन्य कागदपत्रांची पडताळणी करून नियुक्तिपत्र दिले जाते.

जात प्रमाणपत्रासाठी ६ महिनेमागासवर्गीय उमेदवारांना त्यांचे जातप्रमाणपत्र सादर करण्यासाठी ६ महिन्यांची मुदत दिली जाते. जे उमेदवार सर्वसाधारण (ओपन) मधून उत्तीर्ण झाले आहेत, त्यांची नियुक्ती जवळपास निश्चितच झाल्यात जमा असते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर