शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षे झाली तरी कोल्हापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुलींचे वसतिगृह पूर्ण होईना

By पोपट केशव पवार | Updated: May 17, 2024 13:41 IST

दीडशे मुलींची निवास क्षमता

पोपट पवार कोल्हापूर : एकीकडे उच्च शिक्षणामध्ये मुलींना अधिकतर सेवासुविधा देण्यास कटिबद्ध असल्याचे सरकार सांगत असले तरी मुलींसाठीचे सुरू केलेले अनेक प्रकल्प रेंगाळत असल्याचा अनुभव कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहावरून येत आहे. गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे काम अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाही. त्यामुळे कामाची ही संथगती विद्यार्थिनींच्या गैरसोयीची ठरत आहे.येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीयमहाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलींची निवासाची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य सरकारने शेंडा पार्कात १५० मुलींची क्षमता असणारे वसतिगृह उभारण्यास मंजुरी दिली. त्यासाठी २१.६२ कोटी रुपयांचा निधीही दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने हे काम २०२० पासून सुरू आहे. मात्र, या काळात कोरोनाची लाट सुरू असल्याने कामाला ब्रेक द्यावा लागला. पुढे कोरोना संपल्यानंतर हे काम जलद गतीने होणे अपेक्षित होते. मात्र, २०२४ चा मध्य उजाडला तरी हे काम पूर्ण झालेले नाही. पाच मजली इमारतीत अजूनही सिव्हिल विभागाची कामे अपूर्ण आहेत. खिडक्यांना तावदाने बसविण्याचे काम सध्या सुरू असून, इमारतीमधील किरकोळ कामांना अजून हातही लागलेला नाही. गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेले हे काम दोन महिन्यांत पूर्ण करू, असा दावा बांधकाम विभागाकडून केला जात असला तरी सद्य:स्थितीतील अपूर्ण कामे व उपलब्ध कामगार पाहता ही डेडलाइन पाळण्याबाबत साशंकता आहे.

वसतिगृह दृष्टिक्षेपातक्षमता : मुलींच्या वसतिगृहाची इमारत पाच मजली असून, प्रत्येक मजल्यावर १६ अशा एकूण ८० खोल्या आहेत. येथे १५० मुलींच्या निवासाची सोय होणार असून, प्रत्येकी दोन मुलींना एक खोली अशा ७५ खोल्या मुलींसाठी आहेत. उर्वरित खोल्या रेक्टरसाठी आहेत. या वसतिगृहात कॅन्टीनसह सर्व सुविधांचा समावेश आहे.

कामच पूर्ण नाही, तर लोकार्पण कसे करणार?शेंडा पार्कात उभारण्यात येणाऱ्या ११०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयाचे भूमिपूजन व मुलींच्या वसतिगृहाचे लाेकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लवकरच करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते. मात्र, वसतिगृहाचे काम अद्यापही अपूर्णच असल्याने लोकार्पणाला विलंब होणार आहे.

वसतिगृहाचे काम वेगाने पूर्ण करण्याचे नियोजन आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. दोन महिन्यांत पूर्ण होईल. - एस.आर. पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय