शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: टोप-कासारवाडी गौण खनिजच्या इटीएस मोजणी, दंडात्मक नोटिसांचे दप्तर गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 19:23 IST

गौण खनिज आणि हेलिकॉप्टर प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले

दत्ता बिडकरहातकणंगले : टोप-कासारवाडीसह तालुक्यातील क्रशर चालकांनी शासनाची (रॉयल्टी)स्वामित्व कर चुकवून ३ लाख ३० हजार ब्रासचे जादा गौण खनिज उत्खनन केले होते. त्या क्रशर चालकांना जुलै २०२३ मध्ये २३१ कोटींच्या वसुली नोटिसा तत्कालीन प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी दिल्या होत्या.क्रशरचालकांची इटीएस मोजणी प्रकरणे आणि वसुलीच्या दंडात्मक नोटिसांचे दप्तर गौण खनिज टेबल सांभाळणाऱ्या महसूल सहायकाने गायब केल्याने तहसील प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. संबंधित महसूल सहायकाला दप्तर तत्काळ हजर करण्याणेचे आदेश देण्यात आले आहेत.तालुक्यातील टोप-कासारवाडीचा गौण खनिज आणि हेलिकॉप्टर प्रश्न विधिमंडळात गाजल्यानंतर महसूल प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. मागील आठवडयात तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडलाधिकारी व तलाठी यांनी भल्यापहाटे छापेमारी करून ३४ क्रशर सील केले आहेत.विधिमंडळात उपस्थित झालेला गौण खनिजचा विषय जून-जुलै २०२३ मध्ये प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सुहास गाडे यांनी तालुक्याचे ४५ दिवसांचे प्रशासन चालवले त्यावेळचा आहे.टोप-कासारवाडीसह तालुक्यातील क्रशरचालक आणि दगडखाण मालक यांनी शासनाची गौण खनिजची मोठी लूट केल्याचे प्रकरण त्यांनी उघड केले होते. ११ जुलै ते १५ जुलै २०२३ या कालावधीमध्ये त्यांनी दगडखाणीच्या गट नंबरची उपसंचालक भूविज्ञान आणि खनिकर्म संचालक, पुणे यांच्यामार्फत इलेक्ट्रोल टोटल स्टेशन प्रणालीद्वारे (इटीएस) मोजणी करून गौण खनिजच्या लुटीचे बिंग फोडले होते.

या गावातील दगडखाणीच्या गट नंबरची झाली होती इटीएस मोजणीटोप, कासारवाडी, तासगाव, पेठवडगाव, मिणचे, मजले

क्रशरचालकांनी शासनाकडे भरलेली रॉयल्टी

  • गौण खनिज ब्रास = १ लाख ८५ हजार ८८८
  • प्रत्यक्ष जादा उत्खनन ब्रास - ३ लाख ३० हजार
  • रॉयल्टी भरणा पेक्षा २० ते ३० पट जादा उत्खनन

पांच पट दंडात्मक कारवाई नोटिसाप्रतिब्रास- ७ हजारांप्रमाणेदंडात्मक रक्कम २३१ कोटी ३० लाख

टोप-कासारवाडी परिसरातील क्रशर सील केले आहेत. त्यांची रॉयल्टी भरणा आणि प्रत्यक्ष उत्खनन यांची इटीएस मोजणी होणार आहे. २०२३ ला मोजणी झाली होती. गौण खनिजच्या महसूल सहाय्यकाची बदली झाली आहे. इटीएस मोजणी आणि दंडात्मक कारवाईच्या नोटिसांबाबतचे संपूर्ण दप्तर महसूल सहायकाकडे आहे. त्याने ते तत्काळ जमा करण्यासाठी लेखी आदेश दिलेले आहेत. दप्तर मिळाल्यानंतर पुढील कारवाई होईल. - सुशील बेल्हेकर, तहसीलदार