शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

कुडित्रेत धार्मिक कारणावरून जातीय तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 10:42 IST

कुडित्रे (ता. करवीर) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला. सोमवारी सायंकाळी हा तणाव वाढल्याने करवीर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तीन तरुणांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, गावातील अनेक तरुण मिळेल त्या वाहनाने करवीर पोलीस ठाण्याकडे गेले.

ठळक मुद्देकुडित्रेत धार्मिक कारणावरून जातीय तणावतीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात

कोपार्डे : कुडित्रे (ता. करवीर) येथे दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनेमुळे दोन समाजात जातीय तणाव निर्माण झाला. सोमवारी सायंकाळी हा तणाव वाढल्याने करवीर पोलिसांनी घटनास्थळावर येऊन तीन तरुणांना ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, गावातील अनेक तरुण मिळेल त्या वाहनाने करवीर पोलीस ठाण्याकडे गेले.घटनास्थळावरून व ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी कुडित्रे गावातील काही तरुणांना नदीच्या पुराच्या पाण्यात विसर्जन केलेल्या मूर्ती सध्या पाणी कमी झाल्याने उघड्यावर पडलेल्या दिसल्या. त्यांनी या मूर्ती गावच्या स्मशानशेडमध्ये आणून ठेवल्याचे गावातीलच काही तरुणांना दिसले. यामुळे एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यातून वाद सुरू झाला.

ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये एकत्र जमा झाले. या तरुणांना शिक्षा करा, अशी मागणी ग्रामपंचायतीकडे केली. दोन दिवसांपूर्वी सरपंच सरदार पाटील यांनी या तरुणांना व पालकांना ग्रामपंचायतमध्ये बोलावून गैर कृत्याबद्दल माफी मागण्यासाठी सांगितले. यावेळी ग्रामस्थांनी या तरुणांना गावात दोन दिवस स्वच्छता करा, अशी शिक्षा सुचविली. या तरुणांनी ती मान्य केली व प्रकरणावर पडदा पडला.

या तरुणांनी व कुटुबीयांनी दुसऱ्या दिवशी स्वच्छतेचे काम न करता ग्रामस्थांशी असभ्य भाषा वापरल्याचे एका समाजाचे म्हणणे आहे; त्यामुळे पुन्हा गावातील वातावरण चिघळले. सोमवारी सकाळपासून गावात दोन समाजात थोडा तणाव निर्माण झाला. सायंकाळी पाचनंतर गावातील तरुण ग्रामपंचायतीसमोर जमा होऊ लागले.

या प्रकरणाची मोठी चर्चा परिसरात पसरली. वातावरण तणावपूर्ण होऊ लागले. याची माहिती पोलिसांना निनावी फोनद्वारे मिळताच करवीरचे पोलीस पथक गावात दाखल झाले. यावेळी पोलिसांनी शांततेचे आवाहन करत तेढ निर्माण करणाऱ्या तीन तरुणांना ताब्यात घेतले. हे समजताच गावातील संतप्त तरुणांनी मोटारसायकल व टेम्पोतून करवीर पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. या धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर